पुण्यात एकाची दगडाने ठेचून हत्या, 24 तासात आरोपी जेरबंद

पुण्यात एकाची दगडाने ठेचून हत्या, 24 तासात आरोपी जेरबंद

पुणे : तळजाई वस्ती येथे दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती. या निर्घृण हत्या प्रकरणात अवघ्या 24 तासात आरोपींना जेलबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.

अक्षय दिवटे आणि सुमित काळे अशी आरोपींची नावे असून शुक्रवारी म्हणजे 17 मार्चला रंगपंचमीच्या दिवशी रामवतार जाटव हा तळजाई परिसरात जात असताना दारूच्या नशेत धुंद असलेल्या आरोपींच्या गाडीने रामवतारला  धडक दिली होती. त्यामध्ये दोन्ही आरोपी गाडीवरून पडले. त्यामुळे राग आल्याने आरोपी हे मयत रामवतार जाटवला आपल्या गाडीवर बसवून अज्ञात स्थळी घेऊन गेले. त्याठिकाणी त्यांनी रामवतारकडे पैशांची मागणी केली.

रामवतारने त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. ओळख पटू नये  यासाठी दारूच्या नशेत असलेल्या आरोपी अक्षय दिवटे आणि सुमित काळे यांनी याचे तोंड दगडाने ठेचले.

दरम्यान, या हत्या प्रकरणात आरोपींना सहकारनगर पोलिसांनी अटक केली असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: murder pune पुणे हत्या
First Published:
LiveTV