व्हॉट्सअॅपवरील बदनामी जिव्हारी लागल्याने पुण्यात आत्महत्या

विठ्ठल बारणे याने दुकानात खरेदीच्या बहाण्याने हात चलाखी केली आणि भर दिवसा चॉकलेटची बरणी लंपास केली होती.

व्हॉट्सअॅपवरील बदनामी जिव्हारी लागल्याने पुण्यात आत्महत्या

पिंपरी चिंचवड : व्हाट्सअॅपमुळं झालेली बदनामी जिव्हारी लागल्याने एका इसमाने आत्महत्या केली. पुण्याच्या खेड-राजगुरूनगर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. विठ्ठल बारणे असं आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

विठ्ठल यांनी राहत्या दोंदे गावातीलच एका दुकानात खरेदीच्या बहाण्याने हात चलाखी केली आणि भर दिवसा चॉकलेटची बरणी लंपास केली. एक मार्चला घडलेला हा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला.

दुकान मालकाने हा सीसीटीव्ही गावातील व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केला. गावकरी विठ्ठल यांना चिडवू लागले, त्यामुळं त्यांची बदनामी सुरू झाली. ही बदनामी जिव्हारी लागली आणि त्यातूनच आत्महत्या केली असं कुटुंबीयांच म्हणणं आहे.

विठ्ठल यांनी दशक्रिया विधीच्या घाटाजवळ आज पहाटे गळफास घेतला. खेड पोलीस पुढील तपास करत असून कोणी दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करणार आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 45 year old man committed suicide in Pimpri Chinchwad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV