पुण्यात पाच गाड्यांचा विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

2 पीएमपीएमएल बस, कोल्ड्रिंग्स घेऊन जाणारा टेम्पो आणि 2 दुचाकींचा मोठा अपघात झाला.

पुण्यात पाच गाड्यांचा विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

पुणे : शहरातील अप्पर इंदिरानगर भागात पाच गाड्यांचा विचित्र अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले. 2 पीएमपीएमएल बस, कोल्ड्रिंग्स घेऊन जाणारा टेम्पो आणि 2 दुचाकींचा मोठा अपघात झाला.

पीएमपीएमल बसचं ब्रेक फेल झाल्याने ही बस कोल्ड्रिंग्स घेऊन जाणारा ट्रक आणि दुसऱ्या पीएमपीएमएल बसवर आदळली. यामध्ये दोन दुचाकीही बसखाली आल्या. उताराचा रस्ता आणि त्यात ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली.

दरम्यान सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाय वाहने रस्त्यावरुन हटवून वाहतूक सुरळीत केली जात आहे. मात्र या विचित्र अपघाताने अप्पर इंदिरानगर भागात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 5 vehicles met with accident in Upper Indira nagar pune
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: accident pune अपघात पुणे
First Published:
LiveTV