मोबाईल स्क्रीनवर तब्बल 515 प्रकारचे जीवाणू!

मोबाईल स्क्रीनवर तब्बल 515 प्रकारचे जीवाणू!

पुणे : पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मोबाईल फोनवर आढळणाऱ्या जिवाणूंबाबत केलेल्या संशोधनातून अनेक नवीन शोध लागले आहेत.ज्यात शास्त्रज्ञांना जिवाणूंच्या दोन आणि बुरशीच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. त्यापैकी एका जिवाणूची प्रजाती तर मोबाईल स्क्रीनवर मोठ्या संख्येने आढळून आली.

तुमच्या हातात असणाऱ्या मोबाईलवर एक दोन नाही तर तब्बल 515 प्रकारचे जिवाणू आणि 28 प्रकारच्या बुरशींचं घर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे वास्तव आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था अर्थात एनसीसीएसने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

यातील दोन जिवाणू आणि एक बुरशी नव्याने आढळल्या आहेत. त्याचं संशोधन सुरु आहे. मात्र तुम्हाला घारबण्याची गरज नाही. कारण या जिवाणू किंवा बुरशींपासून तुम्हाला कुठलाही धोका नाही, असं डॉक्टर सांगतात.

संशोधन कसं झालं?

या संशोधनासाठी 28 वेगवेगळ्या व्यक्तींच्या मोबाईल्सची सॅम्पल वापरली. यामध्ये कार्यालयांमध्ये काम करणारे, मजुरी करणारे , हॉटेल्समध्ये खानसामा म्हणून काम करणाऱ्यांचा समावेश होता. 28 पैकी 26 फोन्स हे स्मार्टफोन होते, तर दोन फोन हे जुन्या पद्धतीचे होते.

जिवाणूंच्या दोन प्रजातींसोबत बुरशींचीही एक नवीन प्रजाती शास्त्रज्ञांना या संशोधनात आढळली. ही प्रजाती मानवी शरीरावर आढळत नाही, परंतु मोबाईलवर आढळते.

मोबाईलमधील या जिवाणू आणि बुरशींमुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. पण चिमुकल्यांच्या तोंडात मोबाईल जाता कामा नये. शिवाय मोबाईलची अधूनमधून स्वच्छता करणंही हिताचं ठरणार आहे. त्यामुळे मोबाईलवर बोलण्यासोबत त्याच्या स्वच्छेतेही काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

First Published:

Related Stories

बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार!
बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार!

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या

चौकशीच्या नावाखाली छळ केल्याने गर्भपात, राठोड दाम्पत्याचा आरोप
चौकशीच्या नावाखाली छळ केल्याने गर्भपात, राठोड दाम्पत्याचा आरोप

पुणे : माऊंट एव्हरेस्ट सर केल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप असलेल्या

शॉर्टकट पुन्हा जिवावर, पिंपरीत रेल्वे रुळ ओलांडताना तरुण भाजला!
शॉर्टकट पुन्हा जिवावर, पिंपरीत रेल्वे रुळ ओलांडताना तरुण भाजला!

पिंपरी : मालगाडीवरून रेल्वे रूळ ओलांडण्याचा वडिलांनी दिलेला सल्ला

जो तो आपल्या कर्तृत्वानं मोठा आणि छोटा होतो: सदाभाऊ खोत
जो तो आपल्या कर्तृत्वानं मोठा आणि छोटा होतो: सदाभाऊ खोत

पिंपरी-चिंचवड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश

गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या, अजित पवारांची मागणी
गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या, अजित पवारांची मागणी

पुणे: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी

पिंपरीत बारावी निकालाच्या भीतीने सुसाईड नोट लिहून तरुणी बेपत्ता
पिंपरीत बारावी निकालाच्या भीतीने सुसाईड नोट लिहून तरुणी बेपत्ता

पिंपरी-चिंचवड : “मला बारावीचे पेपर अवघड गेले आहेत. मी त्यात नापास

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

पुणे : अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी पुणे विभागाची प्रक्रिया

वृद्ध महिलांना पीएमटीमध्ये लूटणारे दोन आरोपी गजाआड
वृद्ध महिलांना पीएमटीमध्ये लूटणारे दोन आरोपी गजाआड

पुणे : पुणे शहरात पीएमटी बसमध्ये वयोवृद्ध महिलांना गराडा घालून

पुण्यात 100 कोटींचं ड्रग जप्त, 'सिंघम' शिवदीप लांडेंची कारवाई
पुण्यात 100 कोटींचं ड्रग जप्त, 'सिंघम' शिवदीप लांडेंची कारवाई

मुंबई : बिहारमध्ये असताना सिंघम अधिकारी अशी ओळख झालेले आयपीएस

फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!
फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!

मुंबई: निरोगी आयुष्यासाठी फिटनेस नेहमीच महत्वाचा असतो. पण बरेच जण