चहा विक्रेत्याचा अनोखा विक्रम, महिन्याला तब्बल 12 लाख उत्पन्न

पुण्यात एका चहा विक्रेत्यांचं महिन्याचं उत्त्पन्न ऐकून अनेकांना धक्का बसेल. कारण, हे चहा विक्रेते महिन्याला तब्बल 12 लाख रुपये कमावतात. नवनाथ येवले असे या चहा विक्रेत्यांचं नाव असून, ते पुण्यात येवले टी हाऊस नावाने चहा विकतात.

चहा विक्रेत्याचा अनोखा विक्रम, महिन्याला तब्बल 12 लाख उत्पन्न

पुणे : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘पकोडे विकणे हा देखील एक प्रकारचा रोजगार असल्याचे’ वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा अनेक युवक संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. तर विरोधकांनी यावरुन मोदींवर टीकेची झोड उठवली होती.

पण पुण्यात एका चहा विक्रेत्यांचं महिन्याचं उत्त्पन्न ऐकून अनेकांना धक्का बसेल. कारण, हे चहा विक्रेते महिन्याला तब्बल 12 लाख रुपये कमावतात. नवनाथ येवले असे या चहा विक्रेत्यांचं नाव असून, ते पुण्यात येवले टी हाऊस नावाने चहा विकतात.

त्यांच्या येवले टी हाऊसचे सध्या पुण्यात तीन स्टॉल असून, प्रत्येक टी हाऊसमध्ये 12 लोक काम करतात. त्यांच्या चहाच्या चवीमुळे येवले टी हाऊस हे सर्वच चहाप्रेमींचे आवडीचे ठिकाण बनले आहे. अनेक पुणेकर या टी हाऊसला भेट देऊन, चहाचा अस्वाद घेतात.

नवनाथ येवले यांनी एनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत येवले टी हाऊसचा ब्रँड संपूर्ण जगभरात पोहोचवायचा असल्याचं सांगितलं आहे. तसेच, “पकोडे विकून जितका रोजगार उपलब्ध होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात चहा विकून रोजगार मिळत असल्याचं,” त्यांनी स्पष्ट केलं.

शिवाय, आपला चहा विक्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असून, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपण समाधानी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV