महापालिका निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच 'रिचेबल'

महापालिका निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच 'रिचेबल'

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतली सत्ता गेल्यानंतर 'नॉट रिचेबल' झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज पुण्यात उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महपालिकेच्या गट नेत्यांची निवड ते करतील, अशी माहिती शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी दिली आहे.

पुणे महापालिकेतल्या गटनेते पदाच्या शर्यतीत 13 जण आहेत. आज नवनिर्वाचित नगरसेवकांची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलणं टाळलं.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी सत्तेतून पायउतार झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सलग 10 दिवस अजित पवार ‘नॉट रिचेबल’ होते. आता निकालानंतर प्रथमच त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि काही ज्येष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर अजित पवार 10 दिवसांनी कार्यक्रमात दिसून आले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV