'प्लँचेट'प्रकरणी विजय भटकर यांना 'अंनिस'चं आव्हान

By: admin | Last Updated: Saturday, 2 August 2014 5:54 AM
'प्लँचेट'प्रकरणी विजय भटकर यांना 'अंनिस'चं आव्हान

पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेटचा आधार घेतल्याचं संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांनी समर्थन केल्याने, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना आव्हान दिलं आहे. भटकर यांनी प्लँचेट करुन दाभोलकरांच्या हत्येचा तपास करावा, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलं आहे.

 

परदेशात पोलिसांकडून तपास करताना अशा अतींद्रिय शक्तींचा वापर केला जातो, त्यात काहीच गैर नाही असं वक्तव्य विजय भटकर यांनी काहीच दिवसांपूर्वी केलं होतं.

 

दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यासाठी प्लॅँचेटची मदत घेण्यात आली, ही बाब निषेधार्ह आहे. या प्रकाराची चौकशी करुन संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, असं अंनिसने म्हटलं आहे. तसंच प्लॅँचेटमुळे खुनाचा तपास शक्य आहे, हे विजय भटकर यांचं वक्तव्य समाजासाठी दिशाभूल करणारं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रतारणा करणारं आहे. भटकर यांनी प्लॅँचेट प्रकाराने हत्येचा तपास करणं शक्य असल्याचं सिद्ध करावं, असं आव्हान अंनिसने आपल्या प्रसिद्धीपत्रकात केलं आहे.

 

त्याचबरोबरच कोणत्याही चमत्कार किंवा अतींद्रिय शक्तीचा दावा करणाऱ्या आणि प्लॅँचेटमार्फत तपासाच्या सिद्धतेसाठी अंनिस 21 लाखांचे बक्षीस देण्यास तयार आहे, असंही पत्रकात म्हटलं आहे.

 

दरम्यान प्लँचेट वापराच्या निषेधार्थ अंनिसने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

First Published: Saturday, 2 August 2014 5:54 AM

Related Stories

पुण्यात कस्टमकडून एक कोटीचे ड्रोन पकडले
पुण्यात कस्टमकडून एक कोटीचे ड्रोन पकडले

पुणे : उरी हल्ल्यानंतर देशात  सर्वत्र हायअलर्ट दिलेला असताना,

पुण्यात तीन अल्पवयीन मुलींची आत्महत्या
पुण्यात तीन अल्पवयीन मुलींची आत्महत्या

पुणे: पुण्यातल्या खडक परिसरात तीन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली

नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे
नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया...

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापट स्वाभावाचे आहेत.

शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार
शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार

बारामती (पुणे) : मराठा क्रांती मोर्चा आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान सकारात्मक : श्रीपाल सबनीस
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान सकारात्मक :...

पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी डॉ. श्रीपाल

स्मार्ट सिटीसाठी 2000 आयडिया, पालिका आयुक्तांकडून पाणउतारा
स्मार्ट सिटीसाठी 2000 आयडिया, पालिका आयुक्तांकडून पाणउतारा

पुणे : गणेश चव्हाण, स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या स्मार्ट पुण्याचा

जिगरबाज पोलिस कॉन्स्टेबल पवन तायडेला अक्षयकुमारचा सलाम
जिगरबाज पोलिस कॉन्स्टेबल पवन तायडेला अक्षयकुमारचा सलाम

मुंबई : जिगरबाज पोलिस कॉन्स्टेबल पवन तायडे यांना बॉलिवूडचा खिलाडी,

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत मायलेकीला बेदम मारहाण
पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत मायलेकीला बेदम मारहाण

पुणे : सोसायटीतील दोन महिन्यांची कुत्र्याची पिल्ले घेऊन जाण्यास

VIDEO : धावत्या ट्रेनमधून उतरताना तरुणी फलाट-रेल्वेच्या पोकळीत
VIDEO : धावत्या ट्रेनमधून उतरताना तरुणी फलाट-रेल्वेच्या पोकळीत

पिंपरी-चिंचवड : धावत्या ट्रेनमधून उतरु नये अशा प्रकारच्या सूचना

Score Card