निर्माते अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नीला अटक!

By: | Last Updated: > Tuesday, 16 May 2017 3:50 PM
Atul Tapkir suicide case : Wife Priyanka arrested latest news update

पुणे : चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अतुल तापकीर यांची पत्नी प्रियांका, तिचा मावसभाऊ आणि दोन मानलेल्या भावांना बेड्या ठोकल्या आहेत.

अतुल तापकीर यांनी शनिवारी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष पिऊन त्यांनी जीवन संपवलं. अतुल तापकीर हे ‘ढोल ताशा’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांची पुण्यात आत्महत्या

अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये पत्नीवर आरोप करण्यात आले आहेत. ‘ढोल ताशा’ सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियांकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला मानसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे.

यानंतर पत्नी प्रियांकावर डेक्कन पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज ती स्वत:हून डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली. यानंतर तिच्यासह चार जणांना पोलिसांनी आज अटक केली. त्यांना आज पुणे कोर्टात हजर करणार आहेत.

अतुल तापकीर आत्महत्या : पुण्यातील ‘त्या’ पोलिसांची चौकशी!

First Published:

Related Stories

10 दिवसांपासून पाऊस नाही, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
10 दिवसांपासून पाऊस नाही, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

नंदुरबार : पावसाने पाठ फिरवल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी

सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?
सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?

मुंबई : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या

संत निळोबारायांच्या पालखीत अण्णा हजारेही सहभागी
संत निळोबारायांच्या पालखीत अण्णा हजारेही सहभागी

इंदापूर : संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग, नागपूरमध्ये

धनदांडग्यांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा लढा : पांडुरंग फुंडकर
धनदांडग्यांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा लढा : पांडुरंग फुंडकर

बुलडाणा : गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता धनदांडग्या

365 दिवस चालणारी वाशिममधील जिल्हा परिषदेची शाळा 'हाऊसफुल्ल'
365 दिवस चालणारी वाशिममधील जिल्हा परिषदेची शाळा 'हाऊसफुल्ल'

वाशिम : राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांना पटसंख्याअभावी उतरती कळा

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची हजेरी, नागपुरात मुसळधार
मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची हजेरी, नागपुरात मुसळधार

नागपूर/मुंबई : नागपुरात झालेल्या तुफान पावसाने रस्ते जलमय झालेले

मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!
मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!

मुंबई : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची

नियमित कर्ज भरणाऱ्यांचा कर्ज न भरण्याचा इशारा
नियमित कर्ज भरणाऱ्यांचा कर्ज न भरण्याचा इशारा

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक

वायफाय यंत्रणेवर पावसाचं पाणी, ठाणे स्टेशनवरील इंटरनेट बंद
वायफाय यंत्रणेवर पावसाचं पाणी, ठाणे स्टेशनवरील इंटरनेट बंद

ठाणे : मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फटका, लोकल