रिक्षावाल्याचा प्रमाणिकपणा, साडे तीन लाखांचे दागिने परत केले!

Auto Rickshaw Driver returned jewellery latest updates

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील देहू रोडमध्ये रिक्षावाल्याच्या प्रामाणिकतेची प्रचिती आली. रिक्षाचालक वसीम शेख यांनी प्रवासी महिलेचे साडे तीन लाखांचे दागिने परत केले आणि प्रमाणिकपणा अजूनही टिकून असल्याचे दाखवून दिले.

गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वसीम शेख हे देहू रोडजवळील शेलारवाडी येथील भेगडे कुटुंबीयांना एका रुग्णालयातून घेऊन निघाले होते. भेगडे यांना घरी जाण्यापूर्वी आणखी एक काम पूर्ण करायचे असल्याने त्या मध्येच उतरल्या. मात्र, त्यांच्या 4 बॅगांपैकी सोन्याचे दागिने असणारी बॅग ते रिक्षात विसरल्या. अगदी पाच मिनिटांनी त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वसीमची शोधमोहीम सुरु केली.

स्थानिकांच्या मदतीने भेगडे यांनी प्रत्येक रिक्षावाल्याकडे विचारपूस सुरु केली. सुदैवाने वसीम एका ठिकाणी सापडला असता त्याने भलत्याची बॅग समजून त्रयस्थ व्यक्तीला दिली होती. मात्र, प्रामाणिक वसीमला त्या व्यक्तीचा पत्ता माहित असल्याने त्याने तातडीने त्रयस्थ व्यक्तीचं घर गाठलं. बॅग घेतली आणि त्या महिलेला सुपूर्द केली. बॅग पाहताच क्षणी महिलेला अश्रू अनावर झाले. महिलेसह स्थानिकांनी वसीमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

प्रामाणिकपणावरचा विश्वास उडावा अशा घटना आजूबाजूला घडत असताना, वसीम शेख या रिक्षावाल्याने प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचेच दाखवून दिले आहे.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Auto Rickshaw Driver returned jewellery latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप
डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी

पुरुषाच्या पोटात गर्भाशय असल्याचा अहवाल, रुग्णालयाचा भोंगळ कारभार
पुरुषाच्या पोटात गर्भाशय असल्याचा अहवाल, रुग्णालयाचा भोंगळ कारभार

पुणे : पुण्यातलं दिनानाथ मंगेशकर रुग्णालय भोंगळ कारभारावरुन

लडाखमध्ये दरीत पडलेल्या पुण्याच्या पद्मेशवर चंदीगढमध्ये उपचार
लडाखमध्ये दरीत पडलेल्या पुण्याच्या पद्मेशवर चंदीगढमध्ये उपचार

पुणे : ट्रेकिंग करताना लडाखमधल्या स्टोक कांग्री शिखराजवळ

पिंपरीत भर दिवसा धुकं पडल्याने चर्चांना उधाण
पिंपरीत भर दिवसा धुकं पडल्याने चर्चांना उधाण

पुणे: पिंपरी चिंचवडच्या पूर्व आणि उत्तर भागात भर दिवसा धुकं

पुण्यातील तरुण लडाखमध्ये दरीत कोसळून गंभीर जखमी
पुण्यातील तरुण लडाखमध्ये दरीत कोसळून गंभीर जखमी

पुणे : पुण्यातील 32 वर्षीय तरुण लडाखमध्ये अठरा हजार फुटांवर असताना

पोटच्या पोरीला नदीत फेकून आईचा अपहरणाचा टाहो
पोटच्या पोरीला नदीत फेकून आईचा अपहरणाचा टाहो

पुणे : तिनं अजून डोळेही उघडले नव्हते… तिला अजून नावाची ओळखही

पुण्यातली मारहाण वाहतूक पोलिसामुळेच?
पुण्यातली मारहाण वाहतूक पोलिसामुळेच?

पुणे : पुण्यातली हाणामारी ही कॉन्स्टेबलने आधी हात उगारल्यानेच

रिक्षातून बाळाचं अपहरण नव्हे, आईनेच बाळाला नदीत फेकलं!
रिक्षातून बाळाचं अपहरण नव्हे, आईनेच बाळाला नदीत फेकलं!

पुणे: पुण्यात 10 दिवसाच्या मुलाचं अपहरण नाट्यात नवा ट्विस्ट आला आहे.

VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण
VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण

पुणे : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण

पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

पुणे : पुण्यात दहीहंडी साजरी करुन घरी परतणाऱ्या गोविंदाचा अकस्मात