VIDEO : टेम्पोच्या ब्रेक टेस्टवेळी केबिन उलटलं

वाहन चाळीसच्या स्पीडवर असताना ब्रेक दाबल्यास गाडी जागच्या जागी थांबते की नाही, याची तपासणी केली जाणार होती.

VIDEO : टेम्पोच्या ब्रेक टेस्टवेळी केबिन उलटलं

बारामती : टेम्पो ब्रेकच्या तपासणीवेळी केबिन उलटल्याची घटना बारामतीत समोर आली आहे. बारामती प्रादेशिक परिवहन विभागाकडून मालवाहतूक गाडीच्या पासिंगसाठी चाचणी सुरु असताना हा प्रकार घडला.

बारामती येथील एमआयडीसी  कटफळ मार्गावर मालवाहतूक वाहनांची ब्रेक टेस्ट सुरु होती. इंदापूरमधला दुधाचा टेम्पो ब्रेकच्या चाचणीसाठी आला होता.

वाहन चाळीसच्या स्पीडवर असताना ब्रेक दाबल्यास गाडी जागच्या जागी थांबते की नाही, याची तपासणी केली जाणार होती. मात्र ब्रेक दाबताच टेम्पोचं केबिनच खाली आलं.

चासीज नंबर घेतल्यानंतर ही केबिन लॉक करावी लागते. पण ती व्यवस्थित लॉक न केल्यामुळे असे अपघात होत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

हा अपघात होत असताना तरकसे यांनी ब्रेकवरचा पाय न काढल्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहन तपासणारे सहाय्यक मोटर निरीक्षक अभिजीत तरकसे किरकोळ जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Baramati : Cabin falls while break test of tempo latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV