क्रिकेटवर सट्टा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक

क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे.

क्रिकेटवर सट्टा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावण्यात आला होता. निगडी पोलिसांनी जावेद शेख यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे.

सट्ट्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य, लॅपटॉप, मोबाइल आणि 53,500 रुपये रोकड असा एकूण 2 लाख 77 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. चिखलीतील मित्तल इमारतीतील एका फ्लॅटमध्ये हा सट्टा सुरू होता.

दरम्यान, प्रकरणी पाच जणांना अटक करुन पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV