दारुच्या नशेत 26 गाड्या जाळल्या, पुण्यातील जळीतकांडाचा आरोपी अटकेत

दारुच्या नशेत 26 गाड्या जाळल्या, पुण्यातील जळीतकांडाचा आरोपी अटकेत

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गाड्या जाळल्याचा प्रकार घडला आहे. पर्वती परिसरात पार्क केलेल्या 26 दुचाकी आणि चारचाकी जाळण्यात आल्या आहेत. जनता वसाहतीजवळील गाड्या जाळणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीनं दारुच्या नशेत या गाड्या जाळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यातील पर्वती पायथ्याजवळ पार्क केलेल्या 26 दुचाकी आणि एक चारचाकी निलेश उर्फ झब्या हरी पाटील यानं जाळल्या. निलेश हा याच भागातील रहिवासी आहे, त्यानं दारुच्या नशेत गाड्या जाळल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान शनिवारी मध्यरात्री 1 वाजता हा प्रकार झाल्याचं बोललं जात आहे. पर्वती पायथ्याजवळच्या जनता वसाहत गल्ली क्रमांक 38 जवळची ही घटना आहे.

पोलीस चौकीजवळच हा प्रकार घडला होता. तातडीनं तपासाची चक्रं फिरवत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान पुण्यात याआधीही गाड्या जाळण्याचे प्रकार झाले आहेत. यात पिंपळे गुरवमध्ये एका सोसायटीमध्ये सहा गाड्या, उत्तमनगर परिसरात 7 दुचाकी वाहनं,  सिहगड रोडवर वेगवेगळ्या सोसायटीमधे किमान ८० ते ९० दुचाकी व चारचाकी गाड्या पेटवण्यात आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

पुण्यात पुन्हा जळीतकांड, 26 दुचाकी जळून खाक

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV