सत्ताधारी भाजप नगरसेवकाचा पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर राडा

आंदोलन करणारे कामठे यांना निवडणूक आयोगाला बनावट कागदपत्रं सादर केल्याप्रकरणी गेल्या नोव्हेंबरमध्ये सांगवी पोलिसांनी अटक केली होती.

सत्ताधारी भाजप नगरसेवकाचा पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर राडा

पिंपरी चिंचवड : बनावट कागदपत्र प्रकरणी जामिनावर असलेले भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर फ्लेक्स टाकून राडा घातला. शिवाय भाजपला घरचा आहेरही दिला.

शहरात अनाधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट असून, महापालिका याकडे कानाडोळा करत असल्याचा कामठे यांनी आरोप केला. पुरावा म्हणून दोन टेम्पो भरून आणलेले अनधिकृत फ्लेक्स महापालिका प्रवेश द्वारात त्यांनी फेकले.

एकहाती सत्ता असलेल्या भाजपला कामठे यांनी या आंदोलनातून घरचा आहेरही दिला. आंदोलन करणारे कामठे यांना निवडणूक आयोगाला बनावट कागदपत्रं सादर केल्याप्रकरणी गेल्या नोव्हेंबरमध्ये सांगवी पोलिसांनी अटक केली होती.

या प्रकरणी जामिनावर असणारे कामठे यांनी महापालिकेसमोर केलेलं हे काही पहिलंच आंदोलन नाही, तर याआधी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे नगरसेवकांनी असे आंदोलन केले आहेत. त्याप्रकरणी त्यांच्यावर महापालिकेकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आता भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP corporator protest against PCMC
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV