गुजरातच्या निकालाआधीच पुण्यात भाजपच्या सेलिब्रेशनची तयारी

गुजरातचा निकाल काहीही लागो, पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाची जोरदार तयारी केली आहे. लक्ष्मी रोडवर ही तयारी करण्यात आली आहे.

गुजरातच्या निकालाआधीच पुण्यात भाजपच्या सेलिब्रेशनची तयारी

पुणे : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवर आलाय. गुजरातचा निकाल काहीही लागो, पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाची जोरदार तयारी केली आहे. लक्ष्मी रोडवर ही तयारी करण्यात आली आहे.

गुजरात निवडणुकीच्या मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय दाखवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातची ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. तर काँग्रेसनेही गुजरात जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर पाटीदार नेता हार्दिक पटेलने भाजप ईव्हीएममध्ये घोळ करुन जिंकणार असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाल्यानंतरही ईव्हीएम घोळाचा आरोप केला होता. त्यामुळे विविध मुद्द्यांनी ही निवडणूक गाजण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भाजपचेच पुण्यातील सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. गुजरातमध्ये भाजप सत्तेपासून दूर राहिल, असं संजय काकडे म्हणाले होते. आता या संपूर्ण निकालापूर्वीच भाजपने जल्लोषाचीही तयारी केली आहे. त्यामुळे आता देशाचं लक्ष लागलं आहे ते गुजरातच्या निकालाकडे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP’s preparation of celibration ahead of
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV