लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूची गळफास घेऊन आत्महत्या

लग्नाच्या अवघ्या काही तासांपूर्वी नवरी मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत काल (मंगळवार) रात्री घडली.

लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी- लग्नाच्या अवघ्या काही तासांपूर्वी नवरी मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत काल (मंगळवार) रात्री घडली. मात्र, तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सीमा सकारे असं या बावीस वर्षीय तरुणीचं नाव असून तिच्या लग्नासाठी 14 डिसेंबरचा मुहूर्त काढण्यात आला होता. गेले काही दिवस घरात लग्नाची बरीच धावपळही सुरु होती. काल रात्री सीमा हातावर मेंहदी काढून घरी आली आणि थेट आपल्या खोलीत निघून गेली.

यावेळी तिचे आई-वडील काही खरेदीसाठी बाहेर गेले होते. तर बहीण घरात एकटीच होती. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सीमानं आतल्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. त्याचवेळी सीमा ओढणीला लटकलेली पाहून तिच्या बहिणीनं आरडाओरड केला. त्यानंतर तिला खाली उतरवून तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

या संपूर्ण प्रकारामुळे सकारे कुटुंबावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून  सध्या पिंपरी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bride’s Suicide A few hours before marriage in pimpri latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV