संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार: बुधाजीराव मुळीक

संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार: बुधाजीराव मुळीक

पुणे: 'शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार.' अशी घोषणा शेतकरी नेते डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनासाठी ज्या 21 जणांची नवी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात बुधाजीराव मुळीक यांचाही समावेश आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालास उत्पादन खर्चाच्या आधारित कायद्याने हमीभाव, शेतकऱ्यांना पत्नीसह निवृत्तीवेतन कायदा आणि शेती उत्पन्नातील जोखमीचे व्यवस्थापन कायदा करणे. या चार मागण्या त्वरीत मान्य करण्यात याव्या. अशी मागणी यावेळी बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे.

'कर्जमुक्ती करण्यासाठी वेळ लावायची गरज नाही. सध्या राज्यात कांद्यापेक्षा रद्दीचा दर जास्त आहे.' अशी टीकाही मुळीक यांनी यावेळी केली.
'उदयनराजे भोसलेही आंदोलनात सहभागी होणार'

दरम्यान, 'उदयनराजे भोसले यांचा देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून आठवडाभरात उदयनराजे स्वत: आंदोलनात सहभागी होतील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतील.' असंही मुळीक यांनी यावेळी सांगितलं.

पुणतांब्यातील आंदोलनाचा उद्या शेवटचा दिवस, शेतकरी मौन आंदोलन करणार:

दुसरीकडे पुणतांब्यानं पुकारलेल्या संपाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. सरकार बहिरं असल्यानं, उद्या मौन आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

तसेच आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीच्या बैठकीनंतर ठरवणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं.  आता सुकाणू समितीनं आंदोलन सुरुच ठेवण्याची घोषणा केल्यानं पुणतांब्याचे आंदोलक काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी जीएसटीप्रमाणे विशेष आंदोलन बोलवावे अशी मागणीही आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. शिवाय, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास, पुन्हा एकदा सर्व गटतट विसरुन पुणतांब्यातून पुन्हा शेतकऱ्यांचा लढा उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

संंबंधित बातम्या:

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाचा फायदा परराज्यातील शेतकऱ्यांना!

साताऱ्यातील बोरगाव बुद्रुक... कर्ज फेडणारं गाव!

राज्यभरात शेतकऱ्यांचं टाळेठोक आंदोलन

LIVE UPDATE : शेतकरी संपाचा सहावा दिवस, भाजीपाला महागला

पुणतांब्यातील आंदोलनाचा उद्या शेवटचा दिवस, शेतकरी मौन आंदोलन करणार

शेतकरी संपाचा दिल्लीत आवाज, शरद पवार मोदींच्या भेटीला!

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV