पुण्यात एटीएम व्हॅनमधील 4 कोटींची रोकड घेऊन चालक पसार

सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करत व्हॅन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्याने पळ काढला होता. आरोपी चालकाचं नाव अजून समजलेलं नाही.

By: | Last Updated: 30 Sep 2017 08:36 AM
पुण्यात एटीएम व्हॅनमधील 4 कोटींची रोकड घेऊन चालक पसार

पुणे : एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली चार कोटी रुपयांची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना हडपसमध्ये घडली आहे. सासणेनगरमध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

आयसीआयसीआय बँकेच्या सासणेनगरमधील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी खासगी एजन्सीचे कर्मचारी व्हॅनमधून आले होते. त्यांच्यासोबत बंदूकधारी सुरक्षारक्षकही होता. पैसे भरण्यासाठी सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी गाडीतून खाली उतरले.

हीच संधी साधत चालकाने गाडीतील चार कोटींच्या रोकडसह पोबारा केला. सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करत व्हॅन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्याने पळ काढला होता. आरोपी चालकाचं नाव अजून समजलेलं नाही.

याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुणे शहरासह शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV