'राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडेन असं म्हणालो नव्हतो'

'राणेंसाठी मी माझं सार्वजनिक बांधकाम खातं सोडेन या माझ्या वक्तव्याचाही विपर्यास करण्यात आला.' असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

'राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडेन असं म्हणालो नव्हतो'

पुणे : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर आता अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे. राणेंविषयी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कुठलीही चर्चा नाही किंवा राणे आमच्या पक्षातील कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नसल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच राणेंसाठी मी माझं सार्वजिनक बांधकाम खातं सोडेन, या वक्तव्याचाही विपर्यास करण्यात आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

'त्याचा अर्थ असा होत नाही की मी राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडेन'

‘मी काय म्हणालो होतो हे सांगण्याची मला आज संधी आहे. मी गणपतीआधी कोकणातील रस्ते पाहायला गेलो होतो. त्यावेळी मला पत्रकारांनी विचारलं की, राणेंनी सार्वजनिक बांधकाम खातं मागितलं तर तुम्ही काय कराल? त्यावेळी मी म्हणालो की, 'पक्षासाठी, संघटनेसाठी काहीही करायला तयार असतो.' याचा अर्थ असा लावला गेला की, मी राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडायला तयार आहे. असा त्याचा अर्थ होत नाही. बरं झालं त्यांनी तुम्ही मला आज हा प्रश्न विचारला. त्यानिमित्तानं मला आज याविषयी स्पष्टीकरण देता आलं.’ असं चंद्रकात पाटील यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटील आधी काय म्हणाले होते?

राणेंना सार्वजनिक बांधकाम खातं हवं असल्यानं त्यांचा भाजप प्रवेश रखडला का?, त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा म्हणाले की, “मला हे खातं नकोच होतं. त्यामुळे पक्षाच्या आवश्यकतेपोटी असा विषय आला, तर माझी काही हरकत नाही.”

दरम्यान, काल (गुरुवार) नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांच्या पुढच्या राजकीय हालचालींकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे नारायण राणे दसऱ्याला नेमकी कोणती घोषणा करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्याची चंद्रकांतदादांची तयारी

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV