फणा काढलेल्या नागासोबत दोन भावांचा दोन तास थरार

नागाने दोन भावांना दोन तास नजरकैदेत ठेवले. सुदैवाने कुत्रा आल्याने नाग तिथून निघून गेला. मात्र, जाताना एकाच्या पायावर दंश केला. बारामतीतील एमआयडीसीजवळ हा थराराक प्रकार घडला.

Cobra with 2 brothers for 2 hours in Baramati latest updates

बारामती : बारामतीतील एमआयडीसीजवळ एक थराराक प्रकार घडला. एक नाग मध्यरात्री फणा काढून एकाच्या पायावर उभा होता. झोपलेल्या या युवकाला थंड स्पर्श व त्याच्या फुस्करण्याच्या आवाजाने जाग आली आणि पायावर उभा असलेला नाग पाहून प्रचंड घाबरला. त्याचवेळी त्याच्या बाजूला झोपलेला त्याचा भाऊही जागा आला. दोघेही सुमारे दोन तास नाग तिथेच ठिय्या मांडून असल्याने दोन्ही भाऊ नागाच्या नजरकैदेतच राहिले. मात्र, काही वेळाने नागाला हुसकावण्यात यश आले. मात्र, जाताना नागाने डंख मारला, पण विषाचे अंश शरीरात उतरले नसल्याने युवाकाचा जीव वाचला.

काय घडलं?

राजू राठोड व त्याचा धाकटा भाऊ कृष्णा हे मजुरी कामासाठी चार वर्षांपूर्वी बारामतीत आले. मूळचे हे हैदराबाद येथील हे दोघेजण गवंड्याच्या हाताखाली मजुरीचे काम करतात. रोजचे काम करुन जेवण उरकून झाले की झोपी जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला असे त्यांचा दिनक्रम. पण रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे भाऊ त्यांच्या छोट्या पत्र्याच्या शेडच्या समोर झोपले होते. मध्यरात्री अचानक राजूला जाग आली पायाला थंड स्पर्श व फुस्करण्याच्या आवाजाने तो उठला. त्याने पाहिले की त्याच्या पायावर एक भला  मोठा नाग फणा काढून बसला होता. त्याची बोलतीच बंद झाली.

आपण हाललो तर हा आपणास दंश करेल, या भीतीने तो तसाच स्तब्ध एक तास पडून राहिला. शेजारीच त्याचा धाकटा भाऊ झोपला होता. नाग एका तासाने त्याच्या भावाच्या बाजूला गेला. आपला भाऊ धोक्यात येईल म्हणून त्याने भावाला जागे करण्याचा प्रयत्न केला. पण जागे होताना हालला अन् नागाने त्याला त्याच्या पांघरुणावरूनच दंश केला.

कृष्णाला ही सर्व घटना समजली दोघे भयभीत झाले होते. मध्यरात्री आलेला हा नाग तब्बल दोन तास त्यांच्या पायावर फणा काढून उभा होता. हे दोघे काही काळ या नागाच्या नजरकैदेत होते. अखेर राजूने जीवाच्या आकांताने हाका मारायला सुरुवात केली. काहींनी मदत करण्याचे प्रयत्न केले. मात्र नाग त्यांच्या पायावरच असल्याने तेही हतबल झाले. अखेर तेथील एक कुत्रा भुंकत तिथे आला व तो नाग तेथून  निघून गेला.

जाण्यापूर्वी त्याने कृष्णाला दंश केला होता. त्यामुळे तिथे सर्पमित्र बोलाविण्यात आले. कृष्णाला दवाखान्यात नेण्यात आले. नाग त्याला चावला होता पण अंगावर पांघरुण असल्याने त्या नागाचे विष कृष्णाच्या शरीरात उतरले नाही. डॉक्टरांनी दोन दिवस त्याच्यावर वैद्यकीय तपासण्या केल्या.

त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मोठी अडगळ आहे व ते दोघे रात्री बाहेर झोपले होते. या भागात पावसातून सरपटणाऱ्या जीवांचा वावर वाढतो.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Cobra with 2 brothers for 2 hours in Baramati latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: cobra baramati बारामती नाग
First Published:

Related Stories

गिरीश बापटांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट, आरोपीला बेड्या
गिरीश बापटांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट, आरोपीला बेड्या

पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर फेक

उद्योजक अविनाश भोसले आणि विश्वजीत कदमांवर आयकर छापे
उद्योजक अविनाश भोसले आणि विश्वजीत कदमांवर आयकर छापे

पुणे: पुण्यातील नामांकित उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर

हिट अॅण्ड रन: पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू
हिट अॅण्ड रन: पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

पुणे: पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना काल (गुरुवार) घडली.

पुण्यात नागानेच नागाला गिळलं!
पुण्यात नागानेच नागाला गिळलं!

पुणे: पुण्याच्या मंचरमध्ये नागानेच नाग गिळल्याचा प्रकार समोर आला

उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश
उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश

पुणे: शहरालगतच्या  34 गावांपैकी केवळ दोन गावांचा पुणे

पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बिश्रामबाग

शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या ‘भुईकोट’ची तटबंदी ढासळली!
शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या ‘भुईकोट’ची तटबंदी ढासळली!

पुणे : चाकणमधील भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी ढासळली आहे.

लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू
लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू

पिंपरी : लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पडल्यानं एका

लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी
लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी

पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास

तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?
तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?

पुणे : तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरताना थोडं सजग राहणं गरजेचं