'बाय वन अँड गेट वन फ्री' लवकरच हद्दपार होणार!

'बाय वन अँड गेट वन फ्री' किंवा 'बाय थ्री अँड गेट टू फ्री' अशा प्रलोभनांना बळी पडून आपल्यातले अनेकजण शॉपिंग करत असतील. पण महिन्याभरापूर्वी लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात GST चा परिणाम म्हणून आता या फ्री पॉलिसी बंद होणार आहे.

companies will soon be shut down on buy one Get one free plans

पुणे : ‘बाय वन अँड गेट वन फ्री’ किंवा ‘बाय थ्री अँड गेट टू फ्री’ अशा प्रलोभनांना बळी पडून आपल्यातले अनेकजण शॉपिंग करत असतील. पण महिन्याभरापूर्वी लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात GST चा परिणाम म्हणून आता या फ्री पॉलिसी बंद होणार आहे.

बाजारात ‘बाय वन अँड गेट वन फ्री’ म्हणजेच एक खरेदी करा, आणि दुसरी फूकट न्या, अशा  अनेक ऑफर्सचे फलक सर्रासपणे दिसतात. अनेकदा फ्री वस्तूंच्या प्रलोभनापायी आपण आवश्यक नसलेली वस्तूही खरेदी करतो.  मात्र आता ही मोफत असणारी स्कीमच बंद होणार आहे.

कारण जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवाकराच्या नव्या कायद्यामुळे मोफत स्कीमचं अर्थकारणच बिघडलं आहे.  त्यामागचं गणित म्हणजे याआधी एखाद्या वस्तूवर मॅक्सिमम रिटेल प्राईस म्हणजे MRP किती छापावी? याचा कायदाच नव्हता. त्यामुळे त्यावरची किंमत वाढवून कंपन्या फ्री दिलेल्या वस्तूंचेही पैसे वसूल करत होते.

पण आता फ्री दिल्या जाणाऱ्या वस्तूंवरही जीएसटी हा कर लागणार आहे. त्यामुळेच फ्रीची पॉलिसीच बंद करण्याचं अनेक कंपन्यांनी ठरवलं आहे.

वास्तविक, मोफतची स्कीम ही ग्राहकाला अडकवण्याचं जाळचं असतं. कारण कोणतीही कंपनी स्वतःचं दिवाळं काढून, मोफत वस्तू वाटणार नाही. जीएसटीमुळे त्यामागचं अर्थकारण उलगडलं असून, सध्या याचं अर्थकारण कोलमडल्यामुळे कंपन्या या ऑफर बंद करणार आहेत.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:companies will soon be shut down on buy one Get one free plans
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण
VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण

पुणे : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण

पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

पुणे : पुण्यात दहीहंडी साजरी करुन घरी परतणाऱ्या गोविंदाचा अकस्मात

आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार
आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार

पुणे : 10 दिवसांच्या मुलीला रिक्षातून पळवून नेल्याची घटना पुण्यात

डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी

पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या
पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या

पुणे : पुण्यात 32 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली

रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?
रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?

पुणे : पुण्यात पहिल्यांदा गणपती कुणी बसवला, या वादाचा दुसरा भाग आता

ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल
ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल

पुणे : पुण्याची ओळख असलेल्या चितळे स्वीट्स अँड स्नॅक्स या फर्ममधली

‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार कोटींपासून बोली
‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार कोटींपासून बोली

पुणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहारा उद्योगसमूहाचा

पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य
पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये आज चक्क मुख्यमंत्री देवेंद्र

गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले
गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी