पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे.

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

पुणे : आज भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला.

सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला. तर दुसरीकडे फायरब्रिगेडची एक गाडीही पेटवली.

दरम्यान, राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे.

बातमीचा व्हिडीओ :

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Controversy between two groups in sanaswadi latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV