दौंड गोळीबार प्रकरण : माथेफिरु संजय शिंदेला अहमदनगरमधून अटक

दौंडमध्ये अंदाधुंद गोळीबार करुन तिघांचा बळी घेणाऱ्याला माथेफिरुला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे.

दौंड गोळीबार प्रकरण : माथेफिरु संजय शिंदेला अहमदनगरमधून अटक

पुणे : दौंडमध्ये अंदाधुंद गोळीबार करुन तिघांचा बळी घेणाऱ्याला माथेफिरुला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. अहमदनगरच्या सुपामधून संजय शिंदेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

एसआरपीएफचा जवान असलेल्या संजय शिंदेने सुरुवातीला दौडंच्या नगर मोरी चौकात दोघांवर गोळीबार केला आणि त्यानंतर त्यानं बोरावके नगर इथं एकावर गोळी झाडली. संजय हा जुगार खेळून आर्थिक व्यवहार करायचा. याच वादातून गोळीबार केल्याचं समजतं आहे.

गोळीबारात अमोल जाधव, गोपाळ शिंदे आणि प्रशांत पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरुवातीला संजय दौंडमधील घरातच लपल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याच्या घराला वेढा घातला होता. मात्र तो त्याआधीच फरार झाला होता. त्यानंतर त्याचा मोबाइल फोन ट्रॅक करुन त्याला अहमदनगरमधून अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या :

दौंडमध्ये माथेफिरुचा बेछूट गोळीबार, तिघांचा मृत्यू

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: daund firing Sanjay Shinde arrested from Ahmednagar latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV