नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

शवविच्छेदनात दिपाली कोल्हटकर यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याचं आढळून आलं.

नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

पुणे : ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर (वय-65) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पुण्यातील कर्वे नगरमधील राहत्या घरातील किचनमध्ये त्या गुरुवारी रात्री जळालेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं.

शवविच्छेदनात दिपाली कोल्हटकर यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या कर्वेनगर येथील घरात ते पत्नी आणि सासूसह राहतात. त्यांच्याकडे दिवसपाळी आणि रात्रपाळीसाठी दोन नोकर आहेत. कोल्हटकर यांच्या घरातील स्वयंपाकघरातून गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास धूर निघू लागल्याने शेजाऱ्यांनी धाव घेऊन पाहिलं असता दिपाली कोल्हटकर या जळालेल्या अवस्थेत आढळल्या.

पोलिसांना याची माहिती देऊन त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कोल्हटकर यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा अमेरिकेत असतो. तर मुलगी कर्वेनगर परिसरातच वास्तव्यास आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Dilip Kolhatkar’s wife Suspicious death
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV