विद्यार्थ्यांनो, पर्यावरणपूरक गणेश विसर्जनात सहभागी होऊ नका, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा

महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

Dont allowed Student to participate in Ecofriendly Ganpati immersion, says Pune University latest updates

पुणे : पुण्यातील उच्च शिक्षण विभाग हिंदू जनजागृती समितीच्या सांगण्यावरुन काम करते काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पर्यावरणपूरक गणपती विसर्जनात सहभागी न होण्याचा फतवा काढल्याचं उघड झालं आहे.

महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सोबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी हिंदू जनजागृती समितीचं पत्रही जोडलं आहे.

उच्च शिक्षण विभाकडून आलेल्या या आदेशाची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानंही विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना या पत्राची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश देणारी पत्रं पाठवली.

हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे शिक्षण सहसंचालक विजय नारखेडे यांची 29 ऑगस्टला पुण्यात भेट घेतली. त्यानंतर हिंदू जनजागृती समितीनं नारखेडेंना भेटून पर्यावरण पूरक विसर्जन न करण्यासाठी आणि विद्यार्थ्यानी धर्मपरंपरेप्रमाणं होणारं विसर्जन रोखू नये यासाठी विद्यार्थ्यांना आदेश देण्याची मागणी केलीय. त्यानंतर शिक्षण विभागानं हा आदेश काढला आहे.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Dont allowed Student to participate in Ecofriendly Ganpati immersion, says Pune University latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आगामी 3 वर्षात पुण्यात मेट्रो धावणार, महा मेट्रोच्या कार्यकारी संचालकांचं आश्वासन
आगामी 3 वर्षात पुण्यात मेट्रो धावणार, महा मेट्रोच्या कार्यकारी...

पुणे : पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचं कामकाज सध्या जोरात सुरु आहे.

राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे
राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे

पुणे : नारायण राणे यांचे सुपुत्र, कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी

अपमान हा अपमानच, पिंपरीत कर्मचाऱ्याचा झाडाला गळफास
अपमान हा अपमानच, पिंपरीत कर्मचाऱ्याचा झाडाला गळफास

पिंपरी-चिंचवड : चहावरुन झालेल्या वादात अपमान झाल्याचा समज करुन

त्या व्यक्तीमुळे मी दिल्लीला जाणंच टाळलं: शरद पवार
त्या व्यक्तीमुळे मी दिल्लीला जाणंच टाळलं: शरद पवार

पुणे: “मागे एका व्यक्तीने वक्तव्य केलं की माझं बोट पकडून ते

'राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडेन असं म्हणालो नव्हतो'
'राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडेन असं म्हणालो नव्हतो'

पुणे : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर आता अनिश्चिततेचं सावट

तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाची थेट नदीत उडी
तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाची थेट नदीत उडी

पुणे : पुना हॉस्पिटलसमोरील पुलावरून एका युवकाने आज दुपारी बारा

अंकुशच्या 5 मिनिटांच्या कवितेवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस
अंकुशच्या 5 मिनिटांच्या कवितेवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस

मुंबई: सध्या सोशल मीडियावर सुमारे पाच मिनिटांची कविता चांगलीच गाजत

पिंपरी : शाळांमध्ये लालबत्ती खेळाची दहशत!
पिंपरी : शाळांमध्ये लालबत्ती खेळाची दहशत!

पिंपरी चिंचवड : तुमचा पाल्य शाळेत जाऊन लालबत्ती खेळ खेळत असेल तर

जास्त बिल घेतल्याचा संशय, पुण्यात वृद्धाचा डॉक्टरवर चाकूहल्ला
जास्त बिल घेतल्याचा संशय, पुण्यात वृद्धाचा डॉक्टरवर चाकूहल्ला

पुणे : क्षुल्लक वादातून पारा चढल्याने दुसऱ्यावर हल्ला करण्याच्या

बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा? : अजित पवार
बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा? : अजित पवार

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईप्रकरणी आज