स्वस्त घराचं स्वप्न दाखवणाऱ्या सचिन अग्रवालला 5 मेपर्यंत अटक करू नये: हायकोर्ट

By: अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: Tuesday, 3 May 2016 8:31 PM
स्वस्त घराचं स्वप्न दाखवणाऱ्या सचिन अग्रवालला 5 मेपर्यंत अटक करू नये: हायकोर्ट

पुणे : पुण्यात 5 लाखांत घराचं स्वप्न दाखवणाऱ्या मेपल ग्रुपच्या सचिन अग्रवालला 5 मेपर्यंत अटक करू नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, सचिन अग्रवालला गुन्हे दाखल असलेल्या पोलीस ठाण्यात 3 मे आणि 4 मेला हजेरी लावावी लागणार आहे.

तसंच घरासाठी मेपल कंपनीला पैसे देणाऱ्यांची सविस्तर माहिती देण्याचे आदेशही हायकोर्टानं सचिन अग्रवालला दिले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा वापर करून मेपलचा गृह प्रकल्प सरकारी भासवल्याचा आरोप सचिन अग्रवालवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

घराच्या नोंदणीसाठी मेपल कंपनीनं 3 कोटी 74 लाख रुपये गोळा केले असून, त्यापैकी 2 कोटी 90 लाख परत करण्यात आले आहेत, अशी माहिती मॅपलकडून न्यायालयाला देण्यात आली.

First Published: Tuesday, 3 May 2016 8:31 PM

Related Stories

निवडणुकीआधी पुणे महापालिकेकडून वाढीव एफएसआयची खैरात
निवडणुकीआधी पुणे महापालिकेकडून वाढीव एफएसआयची खैरात

पुणे: निवडणुकीच्या तोंडावर पुणे महापालिकेनं विकास नियंत्रण

घरचं भांडण सोशल मीडियावर, पत्नीची हत्या करुन पतीचा गळफास
घरचं भांडण सोशल मीडियावर, पत्नीची हत्या करुन पतीचा गळफास

पुणे : पत्नी घरगुती गोष्टी सोशल मीडियावर शेअर करते या रागातून

सिंधूताईंच्या उद्रेकानंतरही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात
सिंधूताईंच्या उद्रेकानंतरही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची संख्या वाढल्याने

आणखी किती जीव घेणार? तळेगाव टोलनाक्यावर सिंधुताईंचा उद्रेक
आणखी किती जीव घेणार? तळेगाव टोलनाक्यावर सिंधुताईंचा उद्रेक

मुंबई/पिंपरी : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी

काळ्याचं पांढरं केल्याच्या संशयातून राज्यातील 64 ज्वेलर्सची चौकशी
काळ्याचं पांढरं केल्याच्या संशयातून राज्यातील 64 ज्वेलर्सची चौकशी

मुंबई : राज्यभरातील जवळपास 64 ज्वेलर्सवर आयकर खात्यानं कारवाईचा

'मेक इन इंडिया'ची नव्हे, तर 'मेड इन इंडिया'ची गरज: हार्दिक पटेल
'मेक इन इंडिया'ची नव्हे, तर 'मेड इन इंडिया'ची गरज: हार्दिक पटेल

पुणे: गुजरातमधील आरक्षणासाठी आंदोलन करणारे हार्दिक पटेल यांची काल

संसदेतच वाय-फाय चालत नाही, देश कसा डिजिटल होणार?: सुप्रिया सुळे
संसदेतच वाय-फाय चालत नाही, देश कसा डिजिटल होणार?: सुप्रिया सुळे

पिंपरी-चिंचवड: ‘बोलायचं एक आणि करायचं दुसरं, म्हणजेच ‘पार्टी विथ

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर भाजपमध्ये प्रवेश करणार
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर भाजपमध्ये प्रवेश करणार

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्यानंतर पिंपरी

भाजप हा गुंडाचा पक्ष : अजित पवार
भाजप हा गुंडाचा पक्ष : अजित पवार

पिंपरी : भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र आता

तटकरे बंधूंमधील वाद मिटला, शरद पवारांच्या मध्यस्थीला यश
तटकरे बंधूंमधील वाद मिटला, शरद पवारांच्या मध्यस्थीला यश

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीला यश आले