शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

गेल्या 35 वर्षात डीएसकेंनी अनेकांच्या घराला घरपण दिलं. पण आता त्यांच्या घरातील घरपणच हरवलं आहे आणि त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

DSK builder in trouble abp majha special report

पुणे : गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. डीएसकेंचा आतापर्यंतचा प्रवासावर एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट.

घराला घरपण देणारी माणसं… या टॅगलाईन खाली डीएसकेंनी घरं विकताविकता लोकांच्या भावनांना हात घातला आणि त्यांच्या मनावरही अधिराज्य केलं.

कधीकाळी पुण्यातील रस्त्यांवर भाजी विकणाऱ्या दीपक सखाराम कुलकर्णींनी शून्यातून साम्राज्य उभं केलं. फोन पुसता पुसता हा माणूस बिल्डर म्हणून नावारुपाला आला. सुरुवातीला बांधकाम व्यवसायात जम बसल्यावर त्यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्री, शाळा-महाविद्यालयं, हॉस्पिटॅलिटी अशा अनेक क्षेत्रात पाय रोवले.

पुण्यातील रस्ता पेठेतून सुरु झालेला त्यांचा व्यवसाय देशातच नाही तर इंग्लड-अमेरिकेतही पोहचला आहे. डीएसके विश्व उभारण्यासाठी त्यांनी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचा आधार घेतला. शेअर बाजारातून पैसा उभा केला. लोकांनी लाखो रुपये गुंतवले.

मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत.

२०१४ पासून अनेकांनी घरं बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. २०१४ पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.

स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. १९ डिसेंबर २०१४ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला.

सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली.

इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे.

 

घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंचं असं का झालं? 

 

– ड्रीम सिटी प्रोजेक्टसाठी डीएसकेंनी फक्त कागदी घोडे नाचवले.

– एका कंपनीची स्थापना केली.

– डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि त्यांचे नातेवाईक या कंपनीत भागीदार होते.

– कंपनीनं शेतकऱ्यांकडून 55 लाख रुपये प्रतिएकर दरानं जमीन खरेदी केली.

– 6 महिन्यात डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीला ही जमीन 1 कोटी 30 लाख रुपये प्रति एकर या दरानं विकली

– यात हेमंती कुलकर्णी आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रति एकरी 75 लाख रुपयांचा नफा झाला.

– संपूर्ण व्यवहारात 165 कोटी रुपयांचा फायदा झाला

 

 

अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले.

सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं.

मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली

डीएसकेंच्या वीसहून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचे पगारही थकले आहेत. स्वतः डीएसके आणि त्यांच्या पत्नी ही परिस्थिती मान्य करतात. मात्र सगळं खापर नशिबावर फोडतात.

आर्थिक मंदी आणि नोटबंदीमुळे अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं आहे. आपणही त्यामुळेच अडचणीत आल्याचा दावा डीएसके करत आहेत.

पण गुंतवणुकदारांच्या पैशांचं काय? ते कधी मिळणार? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. कधीकाळी कोट्यवधींचे प्रोजेक्ट हातोहात सुरु करणाऱ्या डीएसकेंकडे सध्या आश्वासनाशिवाय दुसरं काही नाही.

गेल्या 35 वर्षात डीएसकेंनी अनेकांच्या घराला घरपण दिलं. पण आता त्यांच्या घरातील घरपणच हरवलं आहे आणि त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

 

डीएसकेचे मालक डी एस कुलकर्णी यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:DSK builder in trouble abp majha special report
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण
VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण

पुणे : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण

पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

पुणे : पुण्यात दहीहंडी साजरी करुन घरी परतणाऱ्या गोविंदाचा अकस्मात

आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार
आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार

पुणे : 10 दिवसांच्या मुलीला रिक्षातून पळवून नेल्याची घटना पुण्यात

डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी

पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या
पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या

पुणे : पुण्यात 32 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली

रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?
रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?

पुणे : पुण्यात पहिल्यांदा गणपती कुणी बसवला, या वादाचा दुसरा भाग आता

ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल
ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल

पुणे : पुण्याची ओळख असलेल्या चितळे स्वीट्स अँड स्नॅक्स या फर्ममधली

‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार कोटींपासून बोली
‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार कोटींपासून बोली

पुणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहारा उद्योगसमूहाचा

पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य
पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये आज चक्क मुख्यमंत्री देवेंद्र

गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले
गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी