डीएसके पुन्हा ससूनमध्ये, चाचण्या सामान्य आढळल्यास कोठडीत रवानगी होणार

अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना आज पुन्हा ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आज ससूनमध्ये आठ डॉक्टरांचं पथक डीएसकेंची तपासणी करेल, त्यानंतर त्यांच्या कोणत्या चाचण्या करायच्या याचा निर्णय घेतला जाईल. तसंच जर रिपोर्ट सामान्य आल्यास डीएसकेंना पुन्हा कोठडीत जावं लागणार आहे.

डीएसके पुन्हा ससूनमध्ये, चाचण्या सामान्य आढळल्यास कोठडीत रवानगी होणार

पुणे : अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना आज पुन्हा ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आज ससूनमध्ये आठ डॉक्टरांचं पथक डीएसकेंची तपासणी करेल, त्यानंतर त्यांच्या कोणत्या चाचण्या करायच्या याचा निर्णय घेतला जाईल. तसंच जर रिपोर्ट सामान्य आल्यास डीएसकेंना पुन्हा कोठडीत जावं लागणार आहे.

दरम्यान आज ससूनमध्ये डीएसके स्वत:च्या पायावर चालत आल्याची माहिती आहे. तसंच त्यांना व्हेंटिलेटरही लावलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आजच्या चाचण्यांनंतर डीएसकेंची रवानगी पुन्हा एकदा कोठडीत होण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. तीन दिवसांपूर्वी याप्रकरणी कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. मात्र, कोठडीत येताच ते पाय घसरुन पडल्याचं सांगण्यात आलं. तसंच त्यांच्या डोक्याला इजा झाल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. यानंतर डीएसकेंना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथं त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, डीएसकेंच्या वकिलांनी गंभीर प्रकृतीचं कारण पुढे करत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार कऱण्याची मुभा मागितली. जी मान्य करण्यात आली होती आणि डीएसकेंना काल दीनानाथ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

आज (मंगळवार) सरकारी डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करेल. त्यानंतरच डीएसकेंना पुन्हा कोठडीत जावं लागेल की रुग्णालयातच विश्रांती घ्यावी लागेल, याचा निर्णय होईल.

डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र, ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आलं.
त्यामुळे मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण शुक्रवारी काढून घेतलं. त्यानंतर त्यांना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक केली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणूकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले.

मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणूकदारांची अडचण झाली आहे.

2014 पासून अनेकांनी घर बूक केलं. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.

स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. 19 डिसेंबर 2014 ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला.

सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली.

इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे.

अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले.

सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं.

मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी कोर्टाने डीएसकेंना पोलीस कोठडीत सुनावली आहे. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

संबंधित बातम्या
डीएसकेंना ससूनमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवलं

डीएसकेंच्या पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतर

डीएसकेंची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

डी. एस. कुलकर्णींना दिल्लीत अटक

डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट

डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी

डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली!

डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर

"डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका

कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: dsk in sasoon hospital for checkup in pune latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV