पुण्यातील इंजिनिअर तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

पुण्यातील मुंढवा येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

पुण्यातील इंजिनिअर तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

पुणे : पुण्यातील मुंढवा येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. अश्विनी गवारे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.

अश्विनी ही मुंढव्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत ट्रेनी म्हणून काम करत होती. मागील काही दिवसांपासून अश्विनी रजेवर होती. आज (सोमवार) सकाळी ती कामावर रुजू झाल्यानंतर काही वेळात त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन तिने आत्महत्या केली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण अश्विनीच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Engineer girl committed suicide in Pune latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV