पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग, सुदैवानं जीवितहानी नाही

पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना काल (बुधवार) घडली आहे.

पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग, सुदैवानं जीवितहानी नाही

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना काल (बुधवार) घडली आहे. चिंचवड गावातील मुख्य बस स्थानकावर ही बस पेटली.

सीएनजीवरील ही बस एका इमारतीसमोर उभी असताना शॉर्टसर्किटमुळे ही बस पेटल्याचं सांगण्यात आलं. बसमधील सीएनजी गॅसची टाकी फुटली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पण अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवंल.

सुदैवाने या बसमध्ये कोणीही प्रवाशी नव्हते. दरम्यान गेल्या महिन्यात दिवे घाटातही पीएमपीएमएलच्या बसने पेट घेतला होता.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Fire due to shorter circuit of PMPML bus latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV