पुण्यात एटीएम सेंटरला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट

पुण्यातील सहकारनगरमधील जनता सहकारी बँकेच्या एटीएमला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

पुण्यात एटीएम सेंटरला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट

पुणे : पुण्यात जनता सहकारी बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना घडली आहे. सहकारनगर परिसरातील एटीएमला ही आग लागली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भीषण आगीत एटीएम पूर्णपणे जळून खाक झालं आहे. आग लागली तेव्हा एटीएममध्ये किती पैसे होते याची माहिती मिळू शकलेली नाही.

अद्याप तरी या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. ही आग लागली की लावण्यात आली याचाही सध्या तपास सुरु आहे. दरम्यान, आगीमुळे एटीएमचं बरंचस नुकसान झालं आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: fire in the ATM center in Pune the cause of fire is unclear latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV