पुणे मेट्रो प्रकल्पाचं आज भूमीपूजन

मोदींच्या हस्ते 24 नोव्हेंबरला पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. आता 10 महिन्यानंतर त्यात त्याच मेट्रोच्या एका मार्गाचं भूमीपूजन गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येत आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाचं आज भूमीपूजन

पुणे: पुण्यातल्या वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गाचे भूमीपूजन आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.

यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 24 नोव्हेंबरला पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. आता 10 महिन्यानंतर त्यात त्याच मेट्रोच्या एका मार्गाचं भूमीपूजन गिरीश बापट यांच्या हस्ते  करण्यात येत आहे.

एकीकडे नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे जात आहे, तिची ट्रायल रनही यशस्वी झाली, तर दुसरीकडे पुण्यातली मेट्रो प्रत्यक्षात कधी धावणार यावर विविध चर्चा रंगत आहे.

या मेट्रोचा काही भाग मुठा नदी पात्रातून जातोय. त्याविरोधातील याचिकेवर अजूनही निर्णय झाला नसतानाही आता बापटांकडून भूमीपूजन केलं जाणार आहे.

आगामी 3 वर्षात पुण्यात मेट्रो धावणार, महा मेट्रोच्या कार्यकारी संचालकांचं आश्वासन

पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचं कामकाज सध्या जोरात सुरु आहे. तसेच पुढच्या 3 वर्षात पुण्यात मेट्रो धावू लागेल, असं आश्वासन महामेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिलं आहे.

तसेच, मेट्रोसाठी नदी पात्रातील एलिव्हेटेड मार्गाच्या विरोधात एनजीटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मेट्रोचं काम सुरुच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मेट्रोला कसलाही अडथळा येणार नाही, असंही ब्रिजेश दीक्षितांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या


पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV