खंडाळ्याजवळ मालगाडीचे 6 डबे घसरले, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत

खंडाळ्याजवळ मालगाडीचे 6 डबे घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे, तर पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस उशिरानं धावत आहेत.

खंडाळ्याजवळ मालगाडीचे 6 डबे घसरले, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत

पिंपरी : देशभरात रेल्वे अपघातांचे सत्र सुरु असताना आज संध्याकाळी खंडाळा स्टेशनजवळ मालगाडीचे सहा डबे रुळावरुन घसरले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मुंबई आणि पुण्यादरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे, तर पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस उशिरानं धावत आहेत. संध्याकाळी चारच्या सुमारास खंडाळ्यात गेट नंबर 29 जवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले.

डबे घसरल्यामुळे रुळालगतचे खांबही कोसळले आहेत. अपघातात रेल्वे रुळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. डबे हटवण्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अपघातानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस खोळंबल्या आहेत. लोणावळा स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

रद्द झालेल्या ट्रेन्स

सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)

सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन रद्द (7 सप्टेंबर)

सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस कर्जतपर्यंतच (7 सप्टेंबर)

पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)

पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)

पुणे-सीएसएमटी डेक्क्न एक्स्प्रेस पुण्याजवळच थांबवली (7 सप्टेंबर)

पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन ( 8 सप्टेंबर)

पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस ( 8 सप्टेंबर)

सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)

सीएसएमटी-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)

कोल्हापूर-सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)

कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच (7 सप्टेंबर)

सीएसएमटी-लातूर एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)

सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस मुंबई ते पुण्यादरम्यान रद्द (7 सप्टेंबर)

सीएसएमटी-हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस (7 सप्टेंबर)

अहमदाबाद -पुुणे अहिंसा एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवर थांबवली (7 सप्टेंबर)

इंदूर-पुणे एक्स्प्रेस सुरतमध्ये रद्द (7 सप्टेंबर)

दादर-मैसूर शरावती एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)

बिजापूर/साईनगर शिर्डी -सीएसएमटी फास्ट पॅसेंजर पुण्यापर्यंत थांबवली (7 सप्टेंबर)

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV