पुण्यात आयटी इंजिनिअरची आत्महत्या

पुण्यात आयटी इंजिनिअरची आत्महत्या

पुणे: आंध्र प्रदेशातून 3 दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या 25 वर्षीय आयटी इंजिनिअरने आत्महत्या केली आहे. गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद असं या इंजिनिअरचं नाव आहे. तो मूळचा आंध्र प्रदेशातील क्रिष्णा जिल्ह्यातील रहिवासी होता.

विशेष म्हणजे तीनच दिवसांपूर्वी तो पुण्यात एका कंपनीत रुजू झाला होता. तिसऱ्याच दिवशी त्याने आत्महत्या केली.

आयटी क्षेत्रात नोकरीची अनिश्चितता असल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं या तरुणानं सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे.

"आयटी क्षेत्रात नोकरीची हमी नाही. मला माझं भविष्य अंधकारमय वाटतंय.  आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटते. माझ्या कुटुंबाची काळजी घ्या. सॉरी. गुड बाय", असा उल्लेख त्याने सुसाईड नोटमध्ये केला आहे.

गोपीकृष्णची सुसाईड नोट तो राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Gopikrishna Durgaprasad pune software engineer suicide
First Published:

Related Stories

LiveTV