अज्ञाताच्या अघोरी भेटवस्तूंमुळे भुजबळ कुटुंबीय दहशतीत

गेल्या दीड महिन्यापासून काही-ना-काही असे प्रकार भुजबळ कुटुंबीयांसंदर्भात घडतच आहेत. काळ्या रंगापासून झालेली सुरुवात लाल रंगावर संपेल, अशी धमकीही त्याने दिली आहे.

अज्ञाताच्या अघोरी भेटवस्तूंमुळे भुजबळ कुटुंबीय दहशतीत

पिंपरी चिंचवड : कुणीही दिलेल्या भेटवस्तूंमुळे सहाजिकच सगळ्यांना आनंद होतो, मात्र पिंपरी चिंचवडमधील भुजबळ कुटुंबीय मात्र भेटवस्तूंमुळे सध्या दहशतीच्या वातावरणात आहेत. भुजबळ कुटुंबातील जयकुमार नामक तरुणाच्या वाढदिवशी कुण्या अज्ञाताने पाठवलेल्या भेटवस्तू भयंकर आहेत.

भुजबळ कुटुंबातील जयकुमारचा वाढदिवस होता. त्याला भेटवस्तू म्हणून कुण्या अज्ञात इसमाने भुजबळ कुटुंबाच्या अंगणात एक डबा ठेवला. त्या डब्यातील वस्तू हादरवणाऱ्या आहेत. त्यात रक्ताने माखलेलं कोंबडीचे तोंड, पत्त्यातील जोकरचं पान आणि मुलगा जयकुमार याचं उलट्या दिशेने लिहिलेले नाव अशा गोष्टी आढळल्या आहेत. या साऱ्या भेटवस्तू जयकुमारला वाढदिवसानिमित्त अज्ञात इसमाने पाठवल्या आहेत.

9 एप्रिलच्या रात्री घडलेल्या हा सारा प्रकार कमी होता की काय, 10 एप्रिल रोजी सकाळी भुजबळ कुटुंबीयांच्या गाडीवर जोकर वगळता पत्त्यातील इतर पत्ते फेकण्यात आले होते.डब्याचे फोटो अज्ञाताने ‘व्हाय सो सीरियस’ या इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटवरुनही शेअर केले आहेत. तसेच, जयकुमारच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो टाकून त्यावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला आहे.

घर आणि इन्स्टाग्रामवर सुरु असलेला हा काहीसा गूढ आणि भयंकर प्रकार जयकुमारच्या क्लासपर्यंत येऊन पोहोचला आहे. जयकुमारने क्लासजवळ पार्क केलेल्या गाडीवर अज्ञाताने काळा रंग फेकला आणि पुन्हा इन्स्टाग्रामवर फोटो टाकून होळीच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या दीड महिन्यापासून असे काही-ना-काही प्रकार भुजबळ कुटुंबीयांसंदर्भात घडतच आहेत. काळ्या रंगापासून झालेली सुरुवात लाल रंगावर संपेल, अशी धमकीही त्याने दिली आहे.

दिवसेंदिवस हे प्रकार वाढू लागल्याने भुजबळ कुटुंबीय दहशतीत आहेत. त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं असून, या सर्व प्रकारामागे ओळखीतील व्यक्ती असण्याची शक्यता पोलिस वर्तवत आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: horrific gifts from unknown person
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV