इंदापूरच्या नगराध्यक्षांचं कचरा डेपोत बर्थ डे सेलिब्रेशन

पण ज्या कचरा डेपोत त्यांनी हा वाढदिवस साजरा केला त्याचं कारण वेगळं आहे. कचऱ्यापासून आपण नेहमी सगळेच जण लांब पळत असतो.

इंदापूरच्या नगराध्यक्षांचं कचरा डेपोत बर्थ डे सेलिब्रेशन

पुणे : वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हटलं की, आलिशान हॉटेलमध्ये किंवा भव्य कार्यालयात जंगी पार्टी, मौज मजा मस्ती असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं. त्यात जर राजकीय व्यक्तीचा वाढदिवस म्हटलं की कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मोठी तयारी केली जाते. पण याविरुद्ध चित्र पाहायला मिळाले ते इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या वाढदिवसाचं.

अंकिता शहा ह्या इंदापूरच्या नगराध्यक्षा आहेत. त्यानी त्यांचा वाढदिवस हा चक्क इंदापूर शहराच्या कचरा डेपोमध्ये साजरा केला आहे. कचरा डेपोमध्ये काम करणाऱ्या महिला आणि नगरपालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या समवेत नगराध्यक्षानी त्यांचा वाढदिवस साजरा केला.

पण ज्या कचरा डेपोत त्यांनी हा वाढदिवस साजरा केला त्याचं कारण वेगळं आहे. कचऱ्यापासून आपण नेहमी सगळेच जण लांब पळत असतो. कचऱ्यातून निघणारा दुर्गंध आपल्याला अस्वस्थ करतो. शेवटी तो कचराच, घाण. मात्र इंदापूर नगरपालिकेने आणि शहरातील आय कॉलेजने मिळून एक करार केला आहे. यात कॉलेजच्या काही तज्ज्ञ प्राध्यापकांनी कचरा विघटन करणाऱ्या जिवाणूंची निर्मिती अर्थात बायोकल्चर तयार केले आहे. यापासून खतनिर्मिती होत आहे. कचरा डेपोवर त्या बायोकल्चरलची फवारणी केल्याने त्याचा दुर्गंध येणं बंद झालं आहे.

आता घराघरात कचऱ्यापासून खत निर्मिती होत आहे. पूर्वी कर्मचारी नाका-तोंडाला रुमाल लावून कचरा डेपोत जावं लागत होतं. पण बायोकल्चरल फवारणीमुळे इंदापूरचा कचरा डेपो दुर्गंधीमुक्त झाला आहे. त्यामुळेच नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा केला.

बायोकल्चरच्या फवारणीमुळे कचरा दुर्गंधीमुक्त होत आहे. शिवाय या ठिकाणी कचऱ्याचं विघटन केलं जातं, त्यावर प्रकिया केली जाते.

सध्या शहरातील अनेक घरात कचरा घरातच साठवून ठेवण्यासाठी, ओला कचरा, सुका कचरा एका जादूई टोकरीत साठवून त्यापासून खत निर्मिती सुरु आहे. याच पद्धतीने शहरातील सर्व घरात असा प्रयोग केला जावा. त्यामुळे इंदापूर स्वच्छ शहर व्हावं, हेच उद्दिष्ट हा वाढदिवस साजरा करण्यामागचे असल्याचं नगराध्यक्षा शहा यांनी व्यक्त केलं. यावेळी नगराध्यक्षांच्या हस्ते कचरा डेपोत वृक्षारोपणही करण्यात आले.

सध्या देशभरातील नगरपालिकांमध्ये स्वच्छ नगरपालिका सर्वेक्षण मोहीम 2018 सुरु आहे. त्यात इंदापूर नगरपालिकेचा वरचष्मा आहे. देशभरात 27 व्या तर राज्यात 14 स्थानावर नगरपालिका पोहोचली आहे. नगराध्यक्षांच्या या आगळ्यावेगळ्या वाढदिवस साजरा करण्याने नक्कीच शहरात ही स्वच्छतेची चळवळ अजून जोमात होण्यास मदत होणार हे नक्की.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Indapur’s nagaradhyaksha celebrates her birthday at dumping ground
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV