पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर देशातलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 18 May 2017 11:51 AM
पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर देशातलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट

पुणे : देशातलं पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात होत आहे. सोलापुरातील 21 वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचं गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्यात येत आहे. 12 निष्णात डॉक्टरांची टीम ही अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी शस्त्रक्रिया करत आहेत.

इतर देशांमध्ये यशस्वीरित्या पार पडलेलं गर्भाशयाचं ट्रान्सप्लांटेशन पहिल्यांदाच भारतात होणार आहे. पुण्याच्या रुग्णालयात तीन महिलांच्या शरीरात त्यांच्या आईच्या गर्भाशयाचं प्रत्यारोपण केलं जाणार आहे.

गुरुवारी सकाळी या शस्त्रक्रियेला सुरुवात होणार असून आईच्या शरीरातील गर्भाशय काढून मुलीला प्रत्यारोपण करण्याच्या प्रक्रियेला आठ तास लागणार आहेत.

विज्ञानाचा चमत्कार! देशातील पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात

त्याचप्रमाणे बडोद्याच्या 24 वर्षीय तरुणीवरही शुक्रवारी गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. तिलाही तिच्या आईचं गर्भाशय दान करण्यात येईल. या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास दोन्ही तरुणींना मातृत्वसुख अनुभवता येईल.

दोन्ही तरुणींवरील शस्त्रक्रियेचा खर्च सात ते आठ लाख रुपयांच्या घरात आहे, मात्र हे प्रत्यारोपण मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आणखी एका महिलेला गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.

पुण्याच्या गॅलक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूटमध्ये (जीएलसीआय) हे प्रत्यारोपण होत आहे. राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने ‘जीएलसीआय’ला गर्भाशय प्रत्यारोपणाचा परवाना दिला होता. पाच वर्षांसाठी हा परवाना प्राप्त झाला आहे.

अमेरिकेत पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी

जगभरात आतापर्यंत फक्त 25 गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यातही प्रत्यारोपणानंतर केवळ दहा महिलांना गर्भधारणा झाली आहे. 2014 साली स्वीडनमध्ये जगातील सर्वात पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण झालं होतं.

बंगळुरुच्या ‘मिलान इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ’लाही दोन महिलांचं गर्भाशय प्रत्यारोपण करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी मिळाली आहे.

गर्भाशयाशी संबंधित काही कारणांमुळे अनेक महिलांना मूल होत नाही. धक्कादायक म्हणजे जगातील जवळपास तीन ते चार टक्के महिला या कारणामुळे मातृत्वापासून वंचित राहतात.

First Published: Thursday, 18 May 2017 11:51 AM

Related Stories

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी काही तासात मतदान
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी काही तासात मतदान

मुंबई : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांच्या

जालन्यात टोपे कुटुंबियांच्या नावे 99 क्विंटल तूर विक्री
जालन्यात टोपे कुटुंबियांच्या नावे 99 क्विंटल तूर विक्री

जालना : व्यापाऱ्यांनी तूर विक्री केल्याच्या संशयावरून जालना

शेतकऱ्यांच्या संपामागं राजकारण, जलसंधारण मंत्री राम शिंदेंचा आरोप
शेतकऱ्यांच्या संपामागं राजकारण, जलसंधारण मंत्री राम शिंदेंचा आरोप

अहमदनगर : राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

लेकीची घोड्यावरुन वरात, लग्नापूर्वी बाबांकडून 'ती'ची स्वप्नपूर्ती
लेकीची घोड्यावरुन वरात, लग्नापूर्वी बाबांकडून 'ती'ची स्वप्नपूर्ती

वाशिम : एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या, वंशाच्या दिव्याचा अट्टाहास,

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चे स्टिकर्स
शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चे स्टिकर्स

कोल्हापूर : कर्नाटक सरकार आणि कानडी भाषेविरोधात बोलणाऱ्या

नागपूरमध्ये 27 मे पासून 100 इलेक्ट्रिक टॅक्सी धावणार!
नागपूरमध्ये 27 मे पासून 100 इलेक्ट्रिक टॅक्सी धावणार!

नागपूर : देशातील पहिलीवहिली इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी येत्या

मालेगावात भाजपचं घुमजाव, गोमांस बंदी उठवण्याचं आश्वासन
मालेगावात भाजपचं घुमजाव, गोमांस बंदी उठवण्याचं आश्वासन

मालेगाव : भाजप सरकारनं देशभरात गोमांस बंदीसाठी कंबर कसलेली असताना

तळीरामांना अद्दल, पुष्पमाला घालून महिलांची गांधीगिरी
तळीरामांना अद्दल, पुष्पमाला घालून महिलांची गांधीगिरी

बुलडाणा : गावातील दारुचं दुकान हटवण्याची मागणी करुनही प्रशासनाने

मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त
मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त

भिवंड : भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी उद्या (24 मे) मतदान होणार

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण
तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली : तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ