इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या रहाटणीमध्ये इन्फोसिसच्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय निनाद पाटीलनं राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली.

‘आत्महत्येस कोणाला जबाबदार धरु नये.’ अशा आशयाची सुसाईड नोटही निनादकडून सापडली आहे. त्यामुळे निनादनं नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? हे अद्याप समजू शकलेलं नाही. निनाद इन्फोसिसमध्ये आयटीत कार्यरत होता.

घरातील सर्व कुटुंबीय गावाला गेले असताना निनादनं हे टोकाचं पाऊल उचललं. 24 वर्षीय निनादच्या आत्महत्येमुळे पाटील कुटंबांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV