डीएसकेंविरोधात हजारो गुंतवणूकदार एकवटले, पोलिसात तक्रार

28 ऑक्टोबरलाच डीएसकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी गुंतवणूकदार तक्रार करण्यासाठी पुढे आले आहेत.

Investors lodged complaints against DSK

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णींविरोधात तक्रार करण्यासाठी हजारो गुंतवणूकदारांनी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये गर्दी केली. 28 ऑक्टोबरलाच डीएसकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी गुंतवणूकदार तक्रार करण्यासाठी पुढे आले आहेत.

गुंतवणूकदारांची मोठी संख्या पाहून आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत टेबल – खुर्च्या टाकून तक्रारी नोंद करुन घेण्यात आल्या. पोलिसांच्या मते, डीएसकेंकडे विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या 33 हजारांहून अधिक आहे.

ज्यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. गेले अनेक महिने डीएसकेंकडे पैसे गुंतवणारे लोक पैसे परत मिळावेत यासाठी कार्यालयाबाहेर खेटे घालत होते. मात्र डीएसके पैसे परत करु शकत नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर 28 ऑक्टोबरला डीएसकेंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे आज डीएसकेंविरोधात तक्रार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार समोर आल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या

डीएसकेंवर सात गुन्हे दाखल, ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला

डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Investors lodged complaints against DSK
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस

VIDEO : 15 फुटी महाकाय अजगर शेळीला गिळताना कॅमेऱ्यात कैद
VIDEO : 15 फुटी महाकाय अजगर शेळीला गिळताना कॅमेऱ्यात कैद

पुणे : पुण्यातील भोरजवळील हरिडुशी गावात एक 15 फुटी महाकाय अजगर आढळून

पुणे : बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्यात पडलं
पुणे : बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्यात पडलं

पुणे : शेक देत असताना 11 दिवसांचं बाळ गंभीर भाजल्याप्रकरणी आता वेगळी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी
कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

पुणे: “मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही.

पुण्यातील PMPML चे कंत्राटी बसचालक संपावर, प्रवाशांचे मोठे हाल
पुण्यातील PMPML चे कंत्राटी बसचालक संपावर, प्रवाशांचे मोठे हाल

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) कंत्राटी चालकांनी

रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची हत्या
रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची हत्या

पिंपरी चिंचवड : पिंपरीतील सराईत गुंड अनिके जाधवची हत्या झाली आहे.

नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यातील क्रेन कोसळली, सात कामगारांचा मृत्यू
नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यातील क्रेन कोसळली, सात...

पुणे : नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पासाठी तयार करण्यात येणारा

मनपा निवडणुकीत बनावट कागदपत्र सादर करणारा भाजप नगरसेवक शरण
मनपा निवडणुकीत बनावट कागदपत्र सादर करणारा भाजप नगरसेवक शरण

पिंपरी-चिंचवड : बनावट कागदपत्र सादर करण्याचा ठपका असणारा पिंपरी

पुण्यात ब्राह्मण महासंघाचा विरोध झुगारुन ‘दशक्रिया’ सिनेमा प्रदर्शित
पुण्यात ब्राह्मण महासंघाचा विरोध झुगारुन ‘दशक्रिया’ सिनेमा...

पुणे : सिनेमात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा महासंघाचा आरोप करत

मुंबई-पुणे प्रवास आता 20 मिनिटांत, हायपरलूप तंत्रज्ञान येणार
मुंबई-पुणे प्रवास आता 20 मिनिटांत, हायपरलूप तंत्रज्ञान येणार

पुणे : मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या 20 मिनिटांत पार करणं शक्य होणार