कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन

'जातीयवाद, धार्मिक तेढ निर्माण करणारे निर्माण करतात. पण आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कायदा-सुव्यवस्था अबाधित राहिल असं वागावं.'

कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन

पुणे : महाराष्ट्रवासियांनो फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा विसरु नका अशी संयमी भूमिका भीमा-कोरेगावच्या हिसांचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतली.

घरातील पाण्याचा नळ आणण्यासाठी बाहेर पडलेल्या राहुल फटांगडेचा भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात हकनाक बळी गेला. मात्र, तरीही राहुलच्या कुटुंबाने शांतेतचं आवाहन केलं आहे. दरम्यान, समाजातील लोकांनी एकमेकांना समजून घेतलं तर दंगली घडणार नाही. असंही मत त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केलं.

'धार्मिक तेढ निर्माण करणारे करत राहतील, तुम्ही प्रलोभनाला बळी पडू नका'

'आमच्या सर्व कुटुंबीयांच्या वतीने, सर्व समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आमचं निवदेन आणि आवाहन आहे की, हा महाराष्ट्र शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या अशा गोष्टी आपल्याला शोभत नाही. जातीयवाद, धार्मिक तेढ निर्माण करणारे निर्माण करतात. पण आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कायदा-सुव्यवस्था अबाधित राहिल असं वागावं.' असं आवाहन राहुल फटांगडेच्या कुटुंबीयांनी केलं आहे.

राहुलच्या कुटुंबीयांनी संयमी भूमिका घेऊन महापुरुषांच्या नावाखाली वातावरण गढूळ करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे.

VIDEO : 


संबंधित बातम्या :

वढूमध्ये दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची बैठक, अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची तयारी

भीमा कोरेगावप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांचं राज्यसभेत निवेदन

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Koregaon Bhima Violence members of the deceased’s family appealed to maintain peace latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV