कोरेगाव-भीमा हिंसाचारातील मृत राहुल फटांगडेच्या कुटुंबाला मदत

एक जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमामध्ये उफाळलेल्या हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता.

कोरेगाव-भीमा हिंसाचारातील मृत राहुल फटांगडेच्या कुटुंबाला मदत

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचारामध्ये प्राण गमवावे लागलेल्या राहुल फटांगडेच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक हात देण्यात आला आहे. राहुलच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली आहे.

पुण्यातील उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब यांनी फटांगडे कुटुंबीयांना ही मदत सुपूर्द केली.

एक जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमामध्ये उफाळलेल्या हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक संघटनांकडून मृत राहुलच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली होती.

Rahul Fatangade family help

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी 12 जणांना अटक


कोरेगाव-भीमात 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तब्बल आठवडाभरानं पोलिसांनी पहिली कारवाई केली. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन जण अल्पवयीन आहेत.

हे सर्व बारा आरोपी कोरेगाव-भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी या तीन गावांमधील आहेत. दोन्ही गटातील व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

1 जानेवारीला कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.

या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला होता. या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता.
संबंधित बातम्या :

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाने इतिहासाची मोडतोड केली : भिडे गुरुजी

‘मला अडकवण्यासाठी कौरवनितीचा वापर’, भिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रिया

देशाचे तुकडे होण्याआधी मी मरण पत्करेन : उदयनराजे

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण


कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन

कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ

थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास

भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा

दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर

दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे

सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Koregaon Bhima violence : State government helps dead Rahul Fatangade’s family latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV