लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू

लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पडल्यानं एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. संतोष सोनकांबळे असं या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो हडपसरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू

पिंपरी : लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पडल्यानं एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. संतोष सोनकांबळे असं या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो हडपसरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

भुशी डॅम परिसराजवळच्या एका डोंगरावर चढत असताना संतोषचा पाय घसरला आणि दगडावर डोकं आपटून तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

भुशी धरण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गेले काही दिवस परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. ती उठवण्याचा निर्णय लोणावळा पोलिसांनी घेतला होता. ही बंदी उठवल्यानंतर पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडली आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV