लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा, चोरीच्या उद्देशानं हत्या

lonavla double murder case solved latest updates

लोणावळा : लोणावळ्यात सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांनी या हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. चोरीच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.

लोणावळ्यात तरुण-तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला

सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह 3 एप्रिलला आयएनएस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. तसंच तपासाला गती मिळत नसल्यानं सार्थकच्या आईनं आत्मदहनाचा इशाराही दिला होता. यानंतर हत्याकांडाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. अखेर या तपासाला यश आलं आहे.

महिन्याभरानंतरही लोणावळा दुहेरी हत्याकांडातील मारेकरी मोकाटच

आरोपीनं चोरीच्या उद्देशानं दारुच्या नशेत ही हत्या केल्याचं कबूल केलं आहे. दरम्यान फरार झालेल्या आरोपीचा तपास पोलिस घेत आहेत.

 

लोणावळा हत्याकांडाचा घटनाक्रम

1 एप्रिल 2017 – श्रुती लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयाच्या हॉस्टेल मधून बाहेर पडली

2 एप्रिल 2017 – सायंकाळी श्रुती आणि सार्थक लोणावळ्यातील एम्बी व्हॅली रोडवर एका मित्राला दिसले

3 एप्रिल 2017 – दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह भुशी धरणावरील डोंगरात आढळले

4 एप्रिल 2017 – महाविद्यालयातील आणि हॉस्टेलमधील दोघांच्या मित्रांची कसून चौकशी सुरु झाली. दरम्यान हत्या झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सार्थकची दुचाकी आणि गॉगल सापडला.

1 मे 2017 – सार्थकचे नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि 20 दिवसात आरोपींना अटक करण्याची मुदत देत, रास्ता रोकोचा इशारा दिला

3 मे 2017 – एका महिना उलटून ही पोलिसांच्या हाती काही न लागल्याने सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशारा दिला

6 मे 2017 – तपासासाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली

3 जून 2017 – दोन महिन्यानंतर हात रिकामे, रास्ता रोकोच्या भीतीने पोलिसांनी नातेवाईकांना आणखी मुदत वाढ घेतली

11 जून 2017 – एक आरोपी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. तर एक फरार झाल्याचं उघड. अटक आरोपी मूळचा लोणावळ्यातला असून दारूच्या नशेत त्याने काहींच्या समोर हत्या केल्याची कबुली दिली. खबऱ्यांकडून ही माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या एका कर्मचारीपर्यंत पोहचली. त्यानुसार 3-4 दिवसापूर्वी त्याला अटक करण्यात आली.

 

काय आहे प्रकरण?

सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह 3 एप्रिलला आयएनएस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते

लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मृत तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते.

‘लोणावळा हत्याकांडाची कसून चौकशी करा’

तरुण अहमदनगरच्या राहुरीचा, तर तरुणी मूळची पुण्याच्या ओतूरची होती.

हे दोघेही रविवारी संध्याकाळपासून गायब होते. मात्र सोमवारी संध्याकाळी लोणावळ्यातल्या आयएनएस शिवाजी समोर आणि भुशी धरणाच्या टेकडीवर या दोघांचे थेट मृतदेहच सापडले.

विवस्त्र करुन तीक्ष्ण वस्तूवर डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. तसंच दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या होत्या.

दोन्ही मृतदेहांचे हात-पाय बांधण्यात आले होते. तर अंगावर आणि डोक्यावर जबर जखमा आढळल्या होत्या.

 

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:lonavla double murder case solved latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 40 किलोंचे दागिने!
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 40 किलोंचे दागिने!

पुणे : पुण्याचे लाडके दैवत म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. यंदा

नाशिकच्या धर्तीवर पुण्याचा विकास शक्य, राज ठाकरेंकडून प्रेेझेंटेशन
नाशिकच्या धर्तीवर पुण्याचा विकास शक्य, राज ठाकरेंकडून...

पुणे : लोकसभा, विधानसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या महापालिका

पुण्यात महिलेची गळा आवळून हत्या, पतीचं आत्मसमर्पण
पुण्यात महिलेची गळा आवळून हत्या, पतीचं आत्मसमर्पण

पुणे : घरगुती वादातून पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना

'कल्याणी टेक्नो फोर्ज'च्या अकाऊंटंटची आत्महत्या, चिठ्ठीत मालकाचं नाव
'कल्याणी टेक्नो फोर्ज'च्या अकाऊंटंटची आत्महत्या, चिठ्ठीत मालकाचं...

पिंपरी चिंचवड : कल्याणी टेक्नो फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश

गणेशोत्सवाबाबत पालिकेच्या कारभाराबद्दल मी समाधानी: कलमाडी
गणेशोत्सवाबाबत पालिकेच्या कारभाराबद्दल मी समाधानी: कलमाडी

पुणे : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे

मंकी हिलजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
मंकी हिलजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली

पिंपरी चिंचवड : लोणावळ्याजवळ मंकी हिलमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या

अंनिसचं सरकारविरोधात 'जबाव दो' आंदोलन
अंनिसचं सरकारविरोधात 'जबाव दो' आंदोलन

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण होत आहेत. याच

मी ज्या विषयात लक्ष देतो, तिथे कुणीच विरोध करत नाही : शरद पवार
मी ज्या विषयात लक्ष देतो, तिथे कुणीच विरोध करत नाही : शरद पवार

बारामती : कृषी विज्ञान केंद्रांना केंद्र सरकारने मदत करणं आवश्यक

...तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन : शरद पवार
...तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन : शरद पवार

बारामती : येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा

डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप
डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी