लोणावळा दुहेरी हत्याकांड : दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या

Lonawala double murder : SIT arrested another accused from Agra

पुणे : लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडातील दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या. लोणावळ्यातून रविवारी एका आरोपीला अटक केल्यानंतर, आज आग्र्यातून दुसऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या.

सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांची हत्येचा अखेर उलगडा झाला. अडीच महिन्यांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याची कबुली एका आरोपीने दिली.

सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह 3 एप्रिलला आयएनएस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. तसंच तपासाला गती मिळत नसल्याने सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशाराही दिला होता. यानंतर हत्याकांडाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. अखेर या तपासाला यश आलं आहे.

आरोपीने चोरीच्या उद्देशानं ही हत्या केल्याचं दारुच्या नशेत कबूल केलं आहे.

दरम्यान, या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीला 40 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पीएसआय गिजे आणि पोलिस कॉन्स्टेबल अमित ठोसर यांनी या हत्याकांडाचा छडा लावला.

काय आहे प्रकरण?

सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह 3 एप्रिलला आयएनएस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते

लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मृत तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते.

‘लोणावळा हत्याकांडाची कसून चौकशी करा’

तरुण अहमदनगरच्या राहुरीचा, तर तरुणी मूळची पुण्याच्या ओतूरची होती.

हे दोघेही रविवारी संध्याकाळपासून गायब होते. मात्र सोमवारी संध्याकाळी लोणावळ्यातल्या आयएनएस शिवाजी समोर आणि भुशी धरणाच्या टेकडीवर या दोघांचे थेट मृतदेहच सापडले.

विवस्त्र करुन तीक्ष्ण वस्तूवर डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. तसंच दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या होत्या.

दोन्ही मृतदेहांचे हात-पाय बांधण्यात आले होते. तर अंगावर आणि डोक्यावर जबर जखमा आढळल्या होत्या.

लोणावळा हत्याकांडाचा घटनाक्रम

1 एप्रिल 2017 – श्रुती लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयाच्या हॉस्टेल मधून बाहेर पडली

2 एप्रिल 2017 – सायंकाळी श्रुती आणि सार्थक लोणावळ्यातील एम्बी व्हॅली रोडवर एका मित्राला दिसले

3 एप्रिल 2017 – दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह भुशी धरणावरील डोंगरात आढळले

4 एप्रिल 2017 – महाविद्यालयातील आणि हॉस्टेलमधील दोघांच्या मित्रांची कसून चौकशी सुरु झाली. दरम्यान हत्या झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सार्थकची दुचाकी आणि गॉगल सापडला.

1 मे 2017 – सार्थकचे नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि 20 दिवसात आरोपींना अटक करण्याची मुदत देत, रास्ता रोकोचा इशारा दिला

3 मे 2017 – एका महिना उलटून ही पोलिसांच्या हाती काही न लागल्याने सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशारा दिला

6 मे 2017 – तपासासाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली

3 जून 2017 – दोन महिन्यानंतर हात रिकामे, रास्ता रोकोच्या भीतीने पोलिसांनी नातेवाईकांना आणखी मुदत वाढ घेतली

11 जून 2017 – एक आरोपी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. तर एक फरार झाल्याचं उघड. अटक आरोपी मूळचा लोणावळ्यातला असून दारूच्या नशेत त्याने काहींच्या समोर हत्या केल्याची कबुली दिली. खबऱ्यांकडून ही माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या एका कर्मचारीपर्यंत पोहचली. त्यानुसार 3-4 दिवसापूर्वी त्याला अटक करण्यात आली.

12 जून 2017 – दुसऱ्या आरोपीला आग्र्यातून अटक

संबंधित बातम्या

लोणावळ्यात तरुण-तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला

महिन्याभरानंतरही लोणावळा दुहेरी हत्याकांडातील मारेकरी मोकाटच

लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा, चोरीच्या उद्देशानं हत्या

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Lonawala double murder : SIT arrested another accused from Agra
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/08/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/08/2017*   शेकडो वर्षाची तिहेरी तलाक

राज्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान
राज्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान

मुंबई : विविध जिल्ह्यातील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि

ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!
ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!

मुंबई : दरवर्षी अनेक जण गणेशोत्सवादरम्यान जेव्हा कोकणात किंवा

मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी...

नवी दिल्ली : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित… 2008 च्या मालेगाव

चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसली, 43 प्रवासी जखमी
चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसली, 43 प्रवासी जखमी

सातारा : एसटी चालकाला चक्कर आल्यामुळे बस शेतात घुसल्याची घटना

राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्याची चंद्रकांतदादांची तयारी
राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्याची चंद्रकांतदादांची...

सिंधुदुर्ग : एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी

VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!
VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!

औरंगाबाद : मराठवाड्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार

राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी
राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी

नागपूर : राम सत्यवचनी होता, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे, याचे

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017   राज्यभरात पावसाचं दमदार

भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार
भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार

कोल्हापूर :  सरकारमध्ये मंत्री कोण असावं, कोण नसावं, याचा निर्णय