महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2017: चंद्रहार, विक्रांत हरले!

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक निकाल लागत आहेत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2017: चंद्रहार, विक्रांत हरले!

पुणे:  महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक निकाल लागत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पहिल्याच फेरीत पराभूत झाला. मॅट विभागात हिंगोलीच्या गणेश जगतापने चंद्रहारला धूळ चारली.

याशिवाय माती विभागात 2014 चा उपमहाराष्ट्र केसरी मुंबईचा पैलवान विक्रांत जाधवही पहिल्याच फेरीत बाद झाला. विक्रांतला लातूरच्या सागर बिराजदारने लोळवलं.

महाराष्ट्र केसरी LIVE

 • #महाराष्ट्रकेसरी स्पर्धा 2017:
  ▶️उपमहापौर केसरी अभिजीत कटके आणि शिवराज राक्षे यांच्यातील कुस्तीत अभिजीत विजयी
  ▶️दुखापतीमुळे माघार घेतलेला शिवराज रुग्णालयात
  ▶️अभिजीतकडून खिलाडूवृत्तीचं दर्शन

 • अभिजीत कटके वि. शिवराज राक्षे तुफान कुस्ती
  अभिजीत विजयी घोषित. दुखापतीमुळे शिवराजची माघार, अभिजीतच्या खिलाडूवृत्तीचंही दर्शन. स्वत: शिवराजवर उपचार.

 • मोठी कुस्ती विलास डोईफोडे विजयी वि. अतुल पाटील.

 • विलासनं अतुलला चीतपट केलं.

 • माती विभाग माऊली जमदाडेचा योगेश पवारवर चीतपट विजय


चंद्रहार पाटील

महाराष्ट्र केसरी किताबासाठी यंदा एक ना अनेक नावांची चर्चा आहे. त्या चर्चेतलं पहिलं नाव होतं अर्थातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचं. चंद्रहारच्या खजिन्यात 2007 आणि 2008 सालच्या महाराष्ट्र केसरीची गदा आहे. त्यानंतर कामगिरीतला चढउतार आणि बळावलेली दुखापत यामुळं चंद्रहारला महाराष्ट्र केसरी जिंकता आला नाही.

सांगली जिल्ह्यातल्या भाळवणी गावचा हा पठ्ठ्या यंदा नव्या जोमाने महाराष्ट्र केसरी उतरला. चंद्रहारने वयाची पस्तिशी ओलांडली असली तरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याची त्याची जिद्द कायम होती.

मात्र यंदा तो पहिल्याच फेरीत बाद झाला.

संबंधित बातम्या

पहिल्याच फेरीत फायनलचा थरार, महाराष्ट्र केसरीचा चुरशीचा ड्रॉ

कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी?

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Maharashtra Kesari 2017 : Chandrahar Patil, Vikrant Jadhav lost
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV