MSBSHSE SSC Class 10th Result 2017 : दहावीचा निकाल जाहीर

MSBSHSE SSC Class 10th Result 2017 : दहावीचा निकाल जाहीर

पुणे : मोठ्या प्रतीक्षेनंतर आज (13 जून) राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे.

यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.  91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे.

बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागातील 96.18 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका 24 जून रोजी दुपारी 3 वाजता शाळेत मिळेल, असं बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी सांगितलं.

दरम्यान, यंदाच्या निकालात 0.82 टक्क्यांनी घट झाली आहे. तसंच 48 हजार 470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 18 जुलैपासून होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली.

विभागनिहाय निकाल

कोकण -96.18 टक्के

कोल्हापूर - 93.59 टक्के

पुणे - 91.95 टक्के

मुंबई - 90.09 टक्के

औरंगाबाद - 88.15 टक्के

नाशिक - 87.76 टक्के

लातूर - 85.22 टक्के

अमरावती - 84.35 टक्के

नागपूर - 83.67 टक्के

कुठे पाहाल निकाल?

http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.

1. www.mahresult.nic.in

2. www.result.mkcl.org

3. www.maharashtraeducation.com

4. https://mahahsscboard.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV