कात्रज बोगद्यावजळ भीषण अपघात, अख्खं कुटुंब मृत्युमुखी

दरीपुलाजवळ आज पहाटे ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक बसली. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला.

कात्रज बोगद्यावजळ भीषण अपघात, अख्खं कुटुंब मृत्युमुखी

पुणे: पुणे-सातारा रस्त्यावर जांभूळवाडी इथं झालेल्या भीषण अपघातात अख्खं कुटुंब मृत्यूमुखी पडलं. दरीपुलाजवळ आज पहाटे ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक बसली. यामध्ये मुंबईच्या माने कुटुंबाचा मृत्यू झाला.

ऋषिकेश यशवंत माने (वय 20) , यशवंत पांडुरंग माने (वय 47), शारदा यशवंत माने आणि रामचंद्र कृष्णा सुर्वे (वय 71) अशी मृतांची नावे आहेत.

अपघातग्रस्त माने कुटुंब आपल्या मुलीला शिक्षणासाठी साताऱ्याला सोडून मुंबईच्या दिशेने परत येत होतं.

यावेळी कारमध्ये यशवंत माने, त्यांची पत्नी शारदा आणि 20 वर्षांचा मुलगा ऋषिकेश बसले होते. तर रामचंद्र सुर्वे हे ड्रायव्हर गाडी चालवत होते. पहाटेची वेळ होती, ड्रायव्हरला आराम मिळावा यासाठी ऋषिकेशने थोडावेळ गाडी चालवायचं ठरवलं आणि स्टेअरींग हातात घेतलं. पण कात्रजच्या घाटात ऋषिकेशचा कारवरचा ताबा सुटला आणि कार ट्रकला जाऊन धडकली.

यात यशवंत माने त्यांची पत्नी शारदा, मुलगा ऋषिकेश आणि ड्रायव्हर रामचंद्र सुर्वे या सगळ्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: major accident at katraj ghat, near pune, 4 died
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV