मद्यधुंद तरुणाकडून नग्न अवस्थेत चारचाकी गाड्यांची तोडफोड

मद्यधुंद तरुणाने केलेल्या तोडफोडीत एका स्कूलव्हॅनसह दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

मद्यधुंद तरुणाकडून नग्न अवस्थेत चारचाकी गाड्यांची तोडफोड

पुणे : मद्यधुंद असलेल्या तरुणाने नग्न अवस्थेत चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. ही घटना विमाननगर परिसरातील म्हाडा कॉलनीत पहाटेच्या सुमारास घडली.

मद्यधुंद तरुणाने केलेल्या तोडफोडीत एका स्कूलव्हॅनसह दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

चाकू उर्फ प्रशांत गलांडे असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दर्शन चव्हाण यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी कलम 504 व कलम 427 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रशांत गलांडे हा मद्यधुंद आणि नग्न अवस्थेत म्हाडा कॉलनी परिसरात आला. यावेळी तेथील रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर त्याने दगड मारण्यास सुरुवात केली. यामध्ये एका स्कूलव्हॅन आणि अन्य एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले.

या गोंधळादरम्यान जागे झालेल्या रहिवाशांनी प्रशांत गलांडे याला पकडून चोप देत, त्याला एअरपोर्ट पोलीस चौकीत नेले आणि त्याच्याविरोधात तक्रार दिली. विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Man attacked on vehicles in Pune latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: attack pune vehicle गाडी दगडफेक
First Published:

Related Stories

LiveTV