मेधा खोलेंविरोधात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने

मेधा खोलेंनी मराठा महिलेविरोधात केलेल्या जातीवाचक व्यवहाराचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मेधा खोलेंविरोधात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने

पुणे:  हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पुणे वेधशाळेच्या कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली.

यावेळी मेधा खोले यांच्याविरोधात शेतकरी कामकार पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही निदर्शनं केली.

मेधा खोलेंनी मराठा महिलेविरोधात केलेल्या जातीवाचक व्यवहाराचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

दरम्यान या प्रकारामुळे आयएमडी कार्यालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून मेधा खोले यांनी पोलिसात तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण?

मेधा खोले यांना गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करणारी सुवासिनी ब्राम्हण महिला हवी होती. 2016 मध्ये निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री त्यांच्याकडे आली. आपल्याला कामाची गरज असल्याचं सांगत त्यांनी खोले यांच्याकडे स्वयंपाकाचं काम मागितलं. त्यावेळी खोले यांनी निर्मला यांच्या घरी जाऊन ही महिला ब्राम्हण आहे की, नाही याची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी तिला स्वयंपाकाचं काम दिलं.

नुकताच पार पडलेल्या गौरी-गणपतीतही निर्मला यांनीच मेधा खोले यांच्या घरी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. पण काल (बुधवार) निर्मला ही ब्राम्हण नसल्याची माहिती खोले यांना समजली. त्यामुळे पुन्हा शाहनिशा करण्यासाठी खोले या निर्मला यांच्या घरी गेल्या. त्यावेळी आपलं नाव निर्मला यादव असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोघींमध्ये बराच वाद झाला. यावेळी आपल्याला महिलेनं दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मेधा खोले यांनी सिंहगड पोलिसात केली आहे.

संबंधित बातम्या

सोवळं मोडल्यानं स्वंयपाकी महिलेवर गुन्हा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

BLOG: खोलेबाईंचे विचार किती खोल खोल खोल

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV