हत्येचा कट रचणाऱ्या 17 जणांना 'मोक्का', 4 पोलिसांचाही समावेश

पुणे शहरात पोलिसांवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता पोलीस पुढील तपास कशाप्रकारे करतात ते पहावं लागेल.

MCOCA  against 17 accused in Kailsh Kadam case latest updates

पुणे : पिंपरीतील कामगार नेते कैलाश कदम यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एकूण 17 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर मोक्का लागण्याची ही पहिलाच वेळ आहे.

कदम यांच्या हत्येचा कट रचण्याचा आरोप असणाऱ्या वकील सुशील मंचरकरसह सराईत गुन्हेगारांना या कटासाठी पळून जाण्यास मदत करणाऱ्या चार पोलिस, माजी स्वीकृत प्रभाग सदस्य हमीद शेख अशा एकूण सतरा जणांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरीत सप्टेंबर महिन्यात कामगार नेते कैलाश कदम यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र तो उधळून लावत पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नगसेविकेचे पती अॅड. सुशील मंचरकर, राष्ट्रवादीचा माजी स्वीकृत सदस्य हमीद नवाब शेख यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र आरोपींनी कोर्टातून पलायन केले त्यानंतर तपास सुरु या तपासात पोलिसांनीच आरोपीना पळून जाण्यास मदत केल्याचं निष्पन्न झाले.

कोर्टातून आरोपींनी पलायन केल्यानंतर त्यांना मदत करणाऱ्या पोलिस कर्मचारी सुभाष खाडे, विजय वाघमारे, शंकर कोकरे आणि संजय चंदनशिवे आणि इतर यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास पोलिसांनी मदत केल्याचेही उघड झाले त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पुणे शहरात पोलिसांवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता पोलीस पुढील तपास कशाप्रकारे करतात ते पहावं लागेल.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:MCOCA against 17 accused in Kailsh Kadam case latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस

VIDEO : 15 फुटी महाकाय अजगर शेळीला गिळताना कॅमेऱ्यात कैद
VIDEO : 15 फुटी महाकाय अजगर शेळीला गिळताना...

पुणे : पुण्यातील भोरजवळील हरिडुशी गावात एक 15 फुटी महाकाय अजगर आढळून

पुणे : बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्यात पडलं
पुणे : बाळ वडिलांच्या हातातून...

पुणे : शेक देत असताना 11 दिवसांचं बाळ गंभीर भाजल्याप्रकरणी आता वेगळी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी
कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या...

पुणे: “मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही.

पुण्यातील PMPML चे कंत्राटी बसचालक संपावर, प्रवाशांचे मोठे हाल
पुण्यातील PMPML चे कंत्राटी बसचालक...

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) कंत्राटी चालकांनी

रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची हत्या
रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची...

पिंपरी चिंचवड : पिंपरीतील सराईत गुंड अनिके जाधवची हत्या झाली आहे.

नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यातील क्रेन कोसळली, सात कामगारांचा मृत्यू
नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पातील...

पुणे : नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पासाठी तयार करण्यात येणारा

मनपा निवडणुकीत बनावट कागदपत्र सादर करणारा भाजप नगरसेवक शरण
मनपा निवडणुकीत बनावट कागदपत्र सादर...

पिंपरी-चिंचवड : बनावट कागदपत्र सादर करण्याचा ठपका असणारा पिंपरी

पुण्यात ब्राह्मण महासंघाचा विरोध झुगारुन ‘दशक्रिया’ सिनेमा प्रदर्शित
पुण्यात ब्राह्मण महासंघाचा विरोध...

पुणे : सिनेमात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा महासंघाचा आरोप करत

मुंबई-पुणे प्रवास आता 20 मिनिटांत, हायपरलूप तंत्रज्ञान येणार
मुंबई-पुणे प्रवास आता 20 मिनिटांत,...

पुणे : मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या 20 मिनिटांत पार करणं शक्य होणार