...आणि मनसे शिवसेनेसाठी धावून आली!  

मुंबईतील नगरसेवक पळवापळवी प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये हीच मनसे शिवसेनेसाठी चक्क धावून आली आहे.

...आणि मनसे शिवसेनेसाठी धावून आली!  

पिंपरी-चिंचवड : मुंबईतील नगरसेवक पळवापळवी प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये हीच मनसे शिवसेनेसाठी चक्क धावून आली आहे. याला निमित्त ठरला तो एक संगणक.

पालिकेतील शिवसेनेच्या कक्षातून भाजपच्या आदेशावरून प्रशासनाने संगणक हटवला. शिवसेनेकडून पालिकेची निवडणूक लढलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर भाजपचा चुकीचा कारभार चव्हाट्यावर आणत आहेत. भापकर यासाठीची निवेदन आणि प्रेस नोट सेना कक्षातील संगणकावर तयार करत होते, म्हणून हा संगणक काढण्यात आल्याच्या चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहेत.

याच वेळी हटवलेला संगणक प्रशासनाने शिवसेनेला पुन्हा द्यावा. अशी मागणी आयुक्त आणि महापौरांकडे करत मनसेने शिवसेनेला साथ दिली आहे. त्यामुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

संबंधित बातम्या :

तेव्हा तिजोरी उघडलेली, आता चोरी कशाला? : संदीप देशपांडे

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब

घोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mns help to Shivsena in Pimpri Chinchwad latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV